बाळापूर : शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने भर हंगामात शेतकरी व शेत मजुरात भीतीचे वातावरण पसरले आहे. खामखेड, बटवाडी, सातरगाव, कोळासा, सांगवी जोमदेव आदी गावांत लोक वस्तीपर्यंत बिबट्या पोहाेचल्याने रात्री पिकास पाणी देण्यासाठी समूहाने शेतकरी शेतात जात आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.
...........................
फाेटाे::: निंबा फाटा..
निंबा फाटा येथील दुकानांसमोर साचले दूषित पाणी
कवठा : काही दिवसांपूर्वी निंबा फाटा येथील नाल्यांचे बांधकाम करण्यात आले, मात्र नाल्यांमधून पाणी वाहून जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्या पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे येथील व्यावसायिक दूषित पाण्यामुळे त्रस्त झाले आहेत. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तरी येथील पाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी व्यावसायिक रामाभाऊ वारकरी, झाडे, कावरे आदींनी मागणी केली आहे.
..................................
फाेटाे:::
पणज येथे संत गाडगेबाबांना अभिवादन
पणज : येथील श्री संत गाडगेबाबा मंदिरात संत गाडगेबाबा यांच्या ६४व्या पुण्यतिथीनिमित्त संत गाडगेबाबा भागवत समिती व समस्त गावकऱ्यांतर्फे संत गाडगेबाबांना रविवारी अभिवादन करण्यात आले. विविध धार्मिक कार्यक्रमही घेण्यात आले. महालक्ष्मी माता ढोलाचे भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. ग्रामस्थांनी, भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. बुधवारवेस परिसरात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी पणज ग्रामस्थ व भाविकांचे सहकार्य लाभले.