लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जून २0१७ मध्ये झालेल्या सीए-सीपीटी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत निकिता अग्रवाल हिने २00 पैकी १९२ गुण पटकावित देशातून चौथे स्थान प्राप्त केले आहे. निकिता देशातून गुणवत्ता यादी झळकल्याने, अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यासोबतच वैदेही मालाणी, संकेत भुतडा यांनी देशातून पहिल्या दहामध्ये येण्याचा मान पटकावला. सीए-सीपीटी या महत्त्वाच्या परीक्षेसाठी अकोला जिल्ह्यातून एकूण ३३0 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सीए होण्यासाठी ही परीक्षा द्यावी आणि ती अत्यंत कठीण परीक्षा समजली जाते. जून २0१७ मध्ये सीए-सीपीटी परीक्षेला बसलेल्या ३३0 विद्यार्थ्यांपैकी १८३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. त्यापैकी १४0 विद्यार्थी हे प्रा. नीरज राठी यांचे विद्यार्थी आहेत. निकिता अग्रवाल हिने सीए-सीपीटी परीक्षेत २00 पैकी १९२ गुण प्राप्त केले. तिचे सहकारी विद्यार्थी वैदेही मालाणी हिने १८९ आणि संकेत भुतडा याने १८५ गुण प्राप्त करून देशातून गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. तसेच ७७ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य श्रेणीत गुण प्राप्त केले आहेत. यापूर्वीच सीएच्या परीक्षेत आरसीएफचे आठ विद्यार्थी सीए झाले आहेत. यामध्ये शुभम बाहेती, कपिश राठी, शीतल चांडक, दीक्षा केडिया, पलक काराणी, नकुल भगत, वसीम ठेकिया यांचा समावेश आहे.
‘सीए-सीपीटी परीक्षेत निकिता अग्रवाल देशातून चौथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:23 AM