लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: दिवेकर मैदान येथे रविवारी खैरागड चषक क्रिकेट स् पर्धेतील चौथ्या सामन्याला सुरुवात झाली. यवतमाळ व बुलडाणा जिल्हा संघात सामना सुरू असून, बुलडाणा संघाने पहिल्या डावात ५0.३ षटकात सर्वबाद २९६ धावा केल्या. यामध्ये निखिल भोसलेने कर्णधार पदाला साजेशी कामगिरी करीत शतक (११0 धावा) झळकाविले.बुलडाणा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घे तला. यवतमाळ संघाने प्रथम फलंदाजी करीत पहिल्या डावात ३0 षटकात सर्वबाद ११0 धावा काढल्या. मानव गुल्हाने याने सर्वाधिक ४६ धावा काढल्या. अन्य फलंदाज बुलडाण्याच्या भेदक गोलंदाजीसमोर तग धरू शकले नाही. रामेश्वर सोनुने याने १0 षटकात ३१ धावा देत यवतमाळ संघाचे पाच गडी पटा पट बाद केले. गोपाळ नीळे याने एक गडी बाद केला. केला. पुरू षोत्तम याने दोन आणि जितू राजदेव याने दोन गडी बाद केले.बुलडाणा संघाच्या सलामी जोडीने आपल्या डावाला निराशाजनक सुरुवात केली. मात्र, त्यानंतर फलंदाजीला उ तरलेल्या तुषार रिंदे याने अर्धशतक (५८ धावा) आणि कर्णधार निखिल भोसले याने शतक (११0 धावा) झळकावि त, सामन्यात रंगत आणली. निखिलने ८३ चेंडूत ११0 धावांची फटकेबाजी केली. बुलडाणा संघाने ५0.३ षटकात सर्वबाद २९६ धावा काढल्या. यवतमाळ संघाकडून मनोज शिंदे याने बुलडाणाचे पाच गडी तंबूत पाठविले. दीपक जोशी व प्रक्षित उ पाध्ये यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला, तर गिरीधन हातमोडे याने दोन गडी बाद केले.यवतमाळ संघाने आपल्या दुसर्या डावाला सुरुवात केली असून, दिवसअखेर ७ षटकात १४ धावा केल्या. लोकेश पाटकोटवार नाबाद १0 धावा आणि श्रीकांत खरडे नाबाद ३ धावांवर खेळत आहे. सामन्यात पंच म्हणून अनिल एदलाबादकर आणि संजय बुंदेले काम पाहत आहे. सामन्यांचे आयोजन विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर तथा जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे.