सहा महिला, तीन पुरुष दगावले
मलकापूर येथील ५८ वर्षीय महिला
कारंजा, ता.मूर्तिजापूर येथील ५० वर्षीय महिला
दहिगाव, बोरगाव मंजू येथील ६५ वर्षीय महिला
खदान येथील ६९ वर्षीय पुरुष
मोठी उमरी येथील ६७ वर्षीय महिला
वलगाव, ता. बाळापूर येथील ४० वर्षीय पुरुष
शिवर येथील ६५ वर्षीय पुरुष
चोहट्टा बाजार येथील ६४ वर्षीय महिला
महान येथील ५२ वर्षीय महिला
रॅपिडमध्ये ११४ पॉझिटिव्ह
अकोट येथे पाच, बार्शीटाकळी येथे नऊ, पातूर येथे पाच, तेल्हारा येथे सहा, मूर्तिजापूर येथे २७, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४०, हेडगेवार लॅब येथे १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
५९४ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, ओझोन हॉस्पिटल येथील एक, युनिक हॉस्पिटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेंट येथील दोन, आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालय एक, सहारा हॉस्पिटल येथील दोन, पाटील हॉस्पिटल येथील दोन, इंदिरा हॉस्पिटल येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, देवसार हॉस्पिटल येथील तीन, नवजीवन हॉस्पिटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ५३५ असे एकूण ५९४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,३१३ रुग्ण उपचाराधीन
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३७,२०३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३०,२७१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ६१९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,३१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.