अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. बुधवार, १७ जून रोजी आणखी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधीतांची संख्या १०८२ वर पोहचली आहे. दरम्यान, ३५० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर म्हणून अकोल्याची ओळख निर्माण झाली असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारपर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०७३ होता. यामध्ये बुधवारी आणखी ९ जणांची भर पडत हा आकडा १०८२ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी एकूण ५४ संदिग्ध रुग्णांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये चार महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दोघे अशोकनगर, दोघे अकोट फैल येथील, तर उर्वरीत दगडीपुल, आदर्श कॉलनी, जुल्फिकार नगर, बार्शीटाकळी व पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान, आतापर्यंत ५६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १ कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे. आतापर्यंत एकूण ६७६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आता ३५० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केल आहे.प्राप्त अहवाल-५४पॉझिटीव्ह-०९निगेटीव्ह-४५आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- १०८२मयत-५६(५५+१)डिस्चार्ज- ६७६दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ३५०
CoronaVirus in Akola : आणखी नऊ रुग्ण वाढले; एकूण बाधित १०८२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 11:53 AM