लाेकमत न्यूज नेटवर्कअकाेला : वेडात वीर दाैडले नऊ..या नऊ जणांच्या हुतात्म्यनंतरा अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ रोजी झाली. डाॅ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.हा दिवस कृषी विद्यापीठात शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येताे़ तसेच स्व़ राजीव गांधी जयंतीनिमित्त सदभावना दिन साजरा करण्यात आला.
शेतकऱ्यांचे मार्गदर्शक असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाची स्थापना विदर्भातच व्हावी याकरिता प्रचंड मोठे आंदोलन १९६८ साली उभारण्यात आले होते. या आंदोलनातील सहभागी आंदोलकांनी २० ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केली होती. विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुऱ्हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे, शेख रफिक शहीद झाले तर असंख्य विदर्भवीर जखमी झाले. या शहिदांचे बलिदान मात्र व्यर्थ गेले नाही.व विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ रोजी झाली.
शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी विद्यापीठ मुख्यालयी शहीद स्मारक येथे विशेष सभेचे आयोजन रविवार, २० ऑगस्ट रोजी करण्यात येते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख तसेच हाेते. यावेळी सर्व वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विद्यापीठ अभियंता, विद्यापीठ ग्रंथपाल, विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त आज रविवारी सद्भावना दिन सद्भावना शपथ घेत साजरा करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी उपस्थित सर्वांनाच सद्भावना शपथ दिली.