लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रेल्वे स्टेशन परिसरातील एका धर्मशाळेत परभणीतील नऊ जण खुनाच्या उद्देशाने अकोल्यात दाखल झाल्याची अफवा उडाल्यानंतर शहर पोलीस उ पअधीक्षक उमेश माने व स्थानिक गुन्हे शाखेने या नऊ जणांना ताब्यात घेतले; मात्र ही केवळ खोटी माहिती असल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडण्यात आल्याची माहिती आहे.परभणी येथील एका युवकाने नोकरी लागण्यासाठी अकोल्यातील एका व्यक्तीला पैसे दिले होते, तर त्याचे आठ मित्र शेगाव येथे दर्शनासाठी आले होते; मात्र हे नऊ जण मोठय़ा घटनेच्या उद्देशाने अकोल्यात दाखल झाल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारावर संयुक्तरीत्या करण्यात आलेल्या छापेमारीत या धर्मशाळेतील तीन खोल्यांमधून नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली; मात्र काहीही समोर येत नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यानंतर नऊ जणांनाही सोडण्यात आले.
पैशांची देवाण-घेवाण जिल्हय़ाबाहेरशासकीय नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून नांदेडच्या युवकाची अकोल्या तील काहींनी फसवणूक केल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या युवकांनीच दिली. यावरून पोलिसांनी सदर युवकांकडून पूर्ण माहिती घेतल्यानंतर पैसे देवाण- घेवाणचा व्यवहार अकोल्याच्या बाहेर झाला असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना त्याच जिल्ह्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.