या आश्रमाचा शुभारंभ २५ डिसेंबर शुक्रवार रोजी नॅशनल कमिटीचे ट्रस्टी डॉ. प्रतापदादा उधवाणी यांच्या हस्ते, तर महाराष्ट्र सहजयोग समितीचे रिजनल समन्वयक सुरेंद्र भैया चौरसिया व नागपूर जिल्हा समन्वयक विवेक काळे आदींच्या उपस्थितीत झाला.
परमपूज्य निर्मला माताजी यांच्या कृपेने देशभरातील तसेच राज्यातील अनेक सहज योगी बंधू तसेच सहज योगी महिलांना खूप मोठ्या प्रमाणात मानसिक लाभ मिळत असल्यामुळे देशभरात श्री निर्मला माताजीचे खूप मोठ्या प्रमाणात सहजयोगाचे जाळे पसरले आहे सहजयोगामुळे अनेक साधकांना आरोग्य शांती समाधान,आनंद परमेश्वरी प्रेम प्राप्त होत आहे तसेच मानवी जीवनामध्ये येत असलेले विविध संकटे तसेच आरोग्यविषयक आजार यावर सुद्धा अनेक जणांनी मात केली आहे, असे प्रतिपादन डाॅ. प्रताप दादा उधवाणी यांनी केले. या आश्रमामुळे येळवण कानशीवनी तसेच अकोला जिल्ह्यातील नागरिकांना या सहजयोग कार्यक्रमांमध्ये हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी उपस्थित राहता येईल, असे आवाहन अकोला जिल्हा समन्वयक संदीप दादा मोरे यांनी केले.