अकोला, दि. ६- देशभरातील सोने, चांदी व्यवसायी, ज्वेलरी मॅन्युफॅक्चर्स, होलसेलर्स व रिटेल यांची शिखर संस्था असलेल्या ऑल इंडिया जेम्स अँन्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अकोल्याचे युवा सराफा व्यवसायी नितीन मदनलाल खंडेलवाल यांची एकमताने निवड झाली आहे.जीजेएफ या नावाने परिचित असलेल्या सोने, चांदी, हिरे मोती व्यवसायातील अतिशय दिग्गज व्यवसायी या संघटनेचे सदस्य असून जवळपास देशभरात १,५७६ सदस्य आहे. अनेक मातब्बर आणि मोठे व्यवसायी या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असताना नितीन खंडेलवाल यांची झालेली निवड ही अकोल्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. ही निवड दोन वर्षांंसाठी आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असे चार विभाग या संघटनेचे असून दर दोन वर्षांंंनी ही निवडणूक होत असते. खंडेलवाल विभागीय अध्यक्ष म्हणूनही याच वर्षी निवडून आले आहेत. गेल्या नऊ दशकांपासून सोने- चांदीच्या व्यवसायात अग्रेसर असलेल्या खंडेलवाल परिवाचे नितीन सदस्य असून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा निर्माण केली आहे. जयपूर येथील प्रमोद अग्रवाल यांची उपाध्यक्षपदी तर इतर १६ जणांची कार्यकारिणी सदस्य म्हणून दोन वर्षांंसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
जेम्स अँन्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन खंडेलवाल
By admin | Published: January 07, 2017 2:31 AM