शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

बसगाड्यांचे अपघात रोखण्यासाठी आता टायरमध्ये ‘नायट्रोजन एअर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 3:49 PM

अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे टायर फुटून होणारे अपघात कमी करण्यासाठी आता एसटीच्या टायरमध्ये ‘नायट्रोजन एअर’ भरली जाणार आहे.

 - संजय खांडेकरअकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे टायर फुटून होणारे अपघात कमी करण्यासाठी आता   टायरमध्ये ‘नायट्रोजन एअर’ भरली जाणार आहे. अकोला एसटी विभागासाठी नायट्रोजन कॉम्प्रेसर दाखल झाले असून, उन्हाळा सुरू होण्यापूर्वी बसगाड्यांच्या टायरमध्ये नायट्रोजन एअर भरण्याचा प्रयोग सुरू होत आहे.विदर्भातील उन्हाळ्याचे तापमान ४८ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढते. वाढत्या तापमानामुळे धावत्या बसगाड्यांचे टायर फुटून अपघात होण्याच्या घटना कायम सुरू असतात. अनेकदा अशा घटनांचा सामना चालक-वाहकांना करावा लागतो. अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील प्रत्येक आगारात नायट्रोजन एअर कॉम्प्रेसर देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील काही निवडक आगारात नायट्रोजन कॉम्प्रेसर पाठविण्यात आले आहे. त्यात अकोला आगार क्रमांक दोनमध्येही नायट्रोजन एअर कॉम्प्रेसरची किट दाखल झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस नायट्रोजन हवा टायरमध्ये भरण्यास सुरुवात होणार आहे. अकोला-वाशिम विभागात एकूण ४१९ बसगाड्या असून, या गाड्यांच्या टायरमध्ये यापुढे सामान्य हवा भरल्या जाणार नाही. नायट्रोजन हवा त्यात भरली जाणार आहे.- टायरमध्ये नायट्रोजन एअर भरल्याने, टायरचे तापमान आहे त्या स्थितीत राहील. त्यामुळे बाह्य तापमानाचा आणि स्पीडने वाढणाऱ्या तापमानाचा फरक टायरवर होणार नाही. परिणामी, अपघाती घटनांचे प्रमाण कमी होईल आणि टायरचे लाइफ वाढणार आहे.-अमोल गाडबैल, यंत्र अभियंता, विभागीय कार्यशाळा, एसटी विभाग, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportराज्य परीवहन महामंडळ