सचिन राऊतअकोला, दि. २६- 'आर्थोपेडिक इम्प्लांट'ची विनापरवाना निर्मिती करणारे कारखाने आणि विनापरवाना तसेच बेकायदेशीररीत्या खरेदी-विक्री करणार्यांवर छापेमारी करीत ७ कोटी ४५ लाख रुपयांचा 'आर्थोपेडिक इम्प्लांट'चा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे; मात्र या प्रतिष्ठान आणि कारखान्यांच्या संचालकांवर अद्याप कारवाई झाली नसल्याची माहिती आहे.'आर्थोपेडिक इम्प्लांट' औषधांच्या व्याख्येत येत असल्याने त्याची निर्मिती करताना आणि खरेदी-विक्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना बंधनकारक आहे; मात्र महाराष्ट्रात आर्थोपेडिक इम्प्लांटह्णची निर्मिती करणार्या कारखान्यांना, खरेदी-विक्री करणार्यांना परवानाच नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या छापेमारीत उघड झाले आहे. राज्यात तब्बल ४२ ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर ७ कोटी ४५ लाख रुपयांचे ह्यआर्थोपेडिक इम्प्लांटह्ण जप्त करण्यात आले; मात्र ज्या कारखान्यांमधून आणि खरेदी-विक्री करणार्यांच्या प्रतिष्ठानांमधून साठा जप्त करण्यात आला, त्यांच्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याचे वास्तव आहे. मानवाच्या शरीरात टाकण्यात येणारी हि ह्यआर्थोपेडिक इम्प्लांटह्ण अन्न व औषध विभागाचे मानांकनास पात्र नाही. ही नियमबाह्य इम्प्लांट शरीरात टाकण्यात आल्याने अनेकांचा जीव धोक्यात सापडल्याचेही वास्तव आहे. त्यामुळे बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि निर्मिती करणार्यांचा साठा जप्त करण्यात आला; मात्र कारवाईला बगल दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.---------------लोकमतचा पाठपुरावाराज्यात विविध ठिकाणी आर्थोपेडिक इम्प्लांटची विनापरवाना खरेदी-विक्री आणि निर्मिती करण्यात येत आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर लोकमतने राज्यभर या प्रकरणाचा पाठपुरावा केला. सात कोटींचा साठाही जप्त करण्यात आला. रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी लोकमतने पुढाकार घेतला आहे.---------------रुग्णांसाठी धोकादायककोणत्याही रुग्णाचे हाड मोडल्यानंतर ते हाड पुन्हा जोडण्याठी ह्यआर्थोपेडिक इम्प्लांटह्ण वापरण्यात येते. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने काही मानके ठरविली आहेत; मात्र परवानाच नसलेल्या कारखान्यातून, काही प्रतिष्ठान आणि थेट डॉक्टर यांच्यातच हा व्यवहार झाल्याने या मानकास अपात्र असलेले ह्यआर्थोपेडिक इम्प्लांटह्ण मानवाच्या शरीरात टाकण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या जिवाशी खेळल्या गेले आहे. हा प्रकार रुग्णांसाठी धोकादायक आहे.
दोषी संचालकांविरुद्ध अद्याप कारवाई नाही!
By admin | Published: March 27, 2017 3:06 AM