- अतुल जयस्वालअकोला : महावितरण च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम मंगळवारपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे. या मोहीमेदरम्यान थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने ग्राहकांनी त्यांचेकडील थकीत वीजबिलाचा लगेच भरणा करून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदीया या पाचही परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे मार्च महिन्यात ४५ कोटी ४४ लाखांवर असलेली थकबाकी सात महिन्यांत तब्बल २०९ कोटी ६५ लाख रुपयांवर पोहचल्याने, महावितरणने या थकबाकीच्या वसुलीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या मोहिमेअतंर्गत ‘बिल नाही तर वीज नाही’ हा संदेश देत थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी-कर्मचा-यांची पथके निर्माण करून वसुली मोहीम राबविली जाणार आहे. प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत आणि पाचही परिमंडलांचे मुख्य अभियंते यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. वसुली करताना कोणाचीही गय होणार नाही. ज्यांनी वीज बिल भरलेले नाही, त्यांच वीज पुरवठा खंडीत करण्याचा आदेश या मोहीमेत सहभागी सर्व पथकांना देण्यात आले आहे.
अशी आहे जिल्हावार थकबाकीसप्टेंबर २०१७ अखेरीस महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत ३९लाखाहून अधिक घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक असून त्यांचेकडील जिल्हावार थकबाकी - अकोला (३२.३७ कोटी), बुलढाणा (२९.०६कोटी), वाशिम (२१.५१ कोटी), अमरावती (३२.४७ कोटी), यवतमाळ (२७.६६ कोटी), चंद्र्रपूर (१०.९६ कोटी), गडचिरोली (५.६४ कोटी), भंडारा (६.४३ कोटी), गोंदीया (१२.९९ कोटी), नागपूर (२७.३९ कोटी) तर वर्धा (९.४ कोटी) अशी एकूण २०९ कोटी ६५ लाख रुपयांवर थकबाकी आहे.मागच्या कारवाईत १९ हजार ग्राहकांवर कारवाईमागिल आठवड्यात राबविलेल्या मोहीमेत थकित वीजबिलांचा भरणा न करणाºया नागपूर परिक्षेत्रातील १९ हजार ५४४ ग्राहकांचा वीजपुरवठा ८ कोटी ९१ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित केला होता. यात नागपूर परिमंडल- ५ हजार ८४६ (१कोटी ७२ लाख), अकोला परिमंडल- ४ हजार ९८५ (३ कोटी), अमरावती परिमंडल- ५ हजार ६२१ (३ कोटी १३ लाख) चंद्रपूर परिमंडल- १ हजार ५९३ ( ६३ लाख) तर गोंदीया परिमंडलात १ हजार ४३३ ग्राहकांचा (५४ लाख) वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.