शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

बायोमेट्रिक मशीनच नाहीत; कर्जमाफीचे अर्ज भरणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:06 AM

अकोला: कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्‍यांकडून ‘आपले सरकार’ पोर्टलवर जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांमार्फत ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत; परंतु ऑनलाइन अर्ज भरताना आधार क्रमांक मोबाइल क्रमांकासोबत संलग्नित (लिंक) नसलेल्या शेतकर्‍यांचे अर्ज भरण्यासाठी ‘बायोमेट्रिक मशीन’ उपलब्ध नसल्याने, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरणार कसे, असा प्रश्न जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांच्या संचालकांपुढे निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्रांपुढे समस्या थकबाकीदार शेतकर्‍यांकडून भरून घेण्यात येत आहेत ‘ऑनलाइन’ अर्जबायोमेट्रिक मशीन केव्हा उपलब्ध होणार असा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्‍यांकडून ‘आपले सरकार’ पोर्टलवर जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांमार्फत ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत; परंतु ऑनलाइन अर्ज भरताना आधार क्रमांक मोबाइल क्रमांकासोबत संलग्नित (लिंक) नसलेल्या शेतकर्‍यांचे अर्ज भरण्यासाठी ‘बायोमेट्रिक मशीन’ उपलब्ध नसल्याने, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरणार कसे, असा प्रश्न जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांच्या संचालकांपुढे निर्माण झाला आहे. सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत थकबाकीदार  शेतकर्‍यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी तसेच कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यासाठी, संबंधित शेतकर्‍यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया २४ जुलैपासून जिल्हय़ात सुरू करण्यात आली. महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायतींचे आपले सरकार सेवा केंद्र आणि कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) केंद्रांमार्फत शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्यात येत आहेत. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्‍यांचा आधार क्रमांक मोबाइल क्रमांकासोबत संलग्नित (लिंक) असणे आवश्यक आहे; परंतु अनेक शेतकर्‍यांचा आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी ‘लिंक’ नसल्याने, ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी येत आहेत. आधार क्रमांक मोबाइल क्रमांकासोबत लिंक नसलेल्या शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी बायोमेट्रिक मशीन आवश्यक आहेत; परंतु जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांवर शासनामार्फत अद्याप बायोमेट्रिक मशीन उपलब्ध झाल्या नाही. त्यामुळे आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी लिंक नसलेल्या शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांवर बायोमेट्रिक मशीन केव्हा उपलब्ध होणार, असा प्रश्न महा ई-सेवा केंद्रांच्या संचालकांसमोर निर्माण झाला आहे.

जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांवर शासनाकडून बायोमेट्रिक मशीन उपलब्ध होणार आहेत. मशीन उपलब्ध झाल्यानंतर आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी लिंक नसलेल्या शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरून घेण्याच्या कामाला गती येणार आहे.-सागर भुतडा, जिल्हा समन्वयक, महाऑनलाईन