अकाेला : शालेय पाेषण आहार याेजनेअंतर्गत अन्न शिजविण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना आता गॅस कनेक्शन दिल जाणार आहेत या पृष्ठभूमीवर अकाेल्यात किती शाळांकडे गॅस कनेक्शन आहे याची माहिती घेतली असता एकाही शाळेत गॅस कनेक्शन नसल्याचे समाेर आले आहे
शालेय पाेषण आहार याेजना अनेक कारणांमुळे वादाची ठरली आहे कधी या पाेषण आहाराच्या दर्जावर प्रश्न उपस्थित राहिले, तर कधी धान्याचा पुरवठा नसल्याच्या तक्रारी आल्यात आता काेराेना काळात तर शाळा बंदच असल्याने पाेषण आहाराचे काय करावे? असा प्रश्नाही प्रशासनासमाेर पडला हाेता सध्याही शाळा बंदच असल्या तरी आता शाळांना पुढील सत्रासाठी गॅस कनेक्शन देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. अकाेल्यात १,४३० शाळांमध्ये पाेषण आहार शिजविला जाताे, मात्र एकाही शाळेत सिलिंडर नसल्याने या सर्व शाळांना सिलिंडर दिल्या जाणार आहेत.
पाेषण आहार शिजविण्यासाठी शाळांनी स्थानिकस्तरावरच व्यवस्था केली आहे एकाही शाळेकडे गॅस कनेक्शन नाही. आता शासन गॅस कनेक्शन देणार असेल तर निर्णयाची प्रत आल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल. -रामेश्वर वसतकार, पाेषण आहार, अधीक्षक
एकूण शाळा १४३० गॅस नसलेल्या शाळा १४३०