शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

स्टेशनवर नियमांची अंमलबजावणी, गाडीमध्ये बेफिकिरी

By atul.jaiswal | Published: March 03, 2021 10:16 AM

No masks, no physical distance in Railway प्रवाशांकडून मात्र मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगला बगल दिली जात असल्याचे मंगळवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.

अकोला : कोरोनाचा उद्रेक थांबला नसला तरी रेल्वेची प्रवासी वाहतूक आता बऱ्याचअंशी पूर्ववत झाली असून, विशेष आरक्षित गाड्या चालविल्या जात आहेत. या गाड्यांमध्ये कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य असले, तरी प्रवाशांकडून मात्र मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगला बगल दिली जात असल्याचे मंगळवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.

मुंबई व कोलकाता या महत्त्वाच्या लोहमार्गावर असलेले अकोला रेल्वे स्थानक हे जंक्शन स्टेशन असून, या ठिकाणी मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या अनेेक गाड्यांचे आवागमण सुरू असते. काेरोना काळात रेल्वेची प्रवासी वाहतूक मर्यादित स्वरूपात सुरू असल्याने सध्या अकोला स्थानकावरून ४६ विशेष गाड्या सुरू आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा, अहमदबाद-हावडा, अमरावती-मुंबई, हटिया-पुणे, सुरत-अमरावती, मुंबई - गोंदिया, कोल्हापूर-गोंदिया आदी गाड्यांचा समावेश आहे, तर दक्षिण-मध्य रेल्वेच्या तिरुपती-अमरावती, जम्मू तावी-नांदेड, जयपूर-हैदराबाद, जयपूर-सिकंदराबाद या लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या पूर्णत: आरक्षित या नियमांखाली सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करणे यासारख्या महत्त्वाच्या नियमांचे पालन होते किंवा नाही, याची पाहणी केली असता अनेकांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार मंगळवारी निदर्शनास आला. फलाटांवर सर्व नियमांच्या अंमलबजावणीवर लक्ष दिले जात असले, तरी चालू गाडीमध्ये नियमांचे पालन होते की नाही, याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

 

आरक्षित डब्यांमध्ये ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग 

रेल्वे स्थानक परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर अंमलबजावणी होत असून, सर्व तपासणी केल्यानंतरच प्रवाशांना फलाटांवर सोडण्यात येते. प्रवासी एकदा गाडीत बसले की, नियमांचा फज्जा उडतो. विशेषत: बैठक संरचना असलेल्या डब्यांमध्ये नियमांना बगल दिली जाते. यासंदर्भात पाहणी केली असता, काचीगुडा-नरखेड इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क नव्हता. गाड्यांमध्ये असलेल्या टीसी व रेल्वे पोलिसांकडून कारवाई होणे अपेक्षित आहे; परंतु त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांची ही बेफिकिरी कोरोना संसर्गास कारणीभूत ठरू शकते.

रेल्वे स्थानकावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी होत असून, प्रवाशांची तपासणी केल्यानंतरच त्यांना फलाटांवर सोडले जाते. गाडीत बसलेल्या प्रवाशांकडून नियमांचे पालन हाेणे अपेक्षित आहे. तसे होत नसेल, तर त्यांच्यावर कारवाईचे अधिकार टीसी व रेल्वे पोलिसांना आहेत.

- ए. एस. नांदुरकर, स्टेशन मॅनेजर, अकोला.

 

 

जिल्ह्यातून जाणाऱ्या गाड्या

मुंबई-हावडा

अहमदाबाद-हावडा

अमरावती - मुंबई

हटिया - पुणे

सुरत - अमरावती

मुंबई - गोंदिया

कोल्हापूर - गोंदिया

नागपूर - कोल्हापूर

नागपूर - पुणे

नागपूर - मडगाव

मालदा टाउन -सुरत

पुणे - हावडा

ओखा-हावडा

पोरबंदर-हावडा

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकcorona virusकोरोना वायरस बातम्या