शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नियाेजनाचा पत्ता नाही; कचरा संकलनाची व्यवस्था काेलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:23 AM

शहरातील सर्व्हिस लाइन, सार्वजनिक ठिकाणी साचणारा केरकचरा जमा करून त्याची डंपिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्यासाठी मनपा प्रशासनाने भाडेतत्त्वावर ३२ ट्रक्टर ...

शहरातील सर्व्हिस लाइन, सार्वजनिक ठिकाणी साचणारा केरकचरा जमा करून त्याची डंपिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्यासाठी मनपा प्रशासनाने भाडेतत्त्वावर ३२ ट्रक्टर नियुक्त केले हाेते. कचरा संकलन करणाऱ्या पुरवठादाराला २००७ पासून सातत्याने मुदतवाढ दिली जात असल्याच्या मुद्द्यावर बाेट ठेवत प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी थेट ट्रॅक्टरचा पुरवठा रद्द केला खरा, परंतु, पर्यायी व्यवस्था ताेेकडी असल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत कचरा संकलनाचा बाेजवारा उडाल्याचे समाेर आले आहे.

शहरातील सार्वजनिक जागा, मुख्य बाजारपेठ, तसेच सर्व्हिस लाइनमध्ये साचणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने भाडेतत्त्वावर ३२ ट्रॅक्टरची व्यवस्था निर्माण केली हाेती. त्यावरील मजूर, चालकांचे मानधन व वाहनाचे इंधन मनपाकडून अदा केले जात हाेते. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ट्रॅक्टर व त्यावरील मजुरांच्या पुरवठ्याला मुदतवाढ देण्याचा मुद्दा पटलावर आला असता प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी एकाच पुरवठादाराला सातत्याने मुदतवाढ का, दरवर्षी नवीन निविदा का प्रसिद्ध केली जात नाही ,असा मुद्दा उपस्थित केला. वास्तविक, यासंदर्भात सत्ताधारी भाजपने नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यास सहमती देणे अपेक्षित हाेते. भाजपची नेहमीप्रमाणे साेयीची भूमिका पाहून आयुक्त अराेरा यांनी तडकाफडकी कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु, निर्णय घेण्यापूर्वी मनपाकडे असलेली पर्यायी व्यवस्था सक्षम आहे का, याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम समाेर आले आहेत. ऐन हरितालिका, गणेशाेत्सव व ज्येष्ठा गाैरींच्या सणासुदीच्या दिवसांत शहरात सर्वत्र घाण व कचऱ्याचे ढीग साचल्याचे किळसवाणे चित्र पाहायला मिळत आहे.

प्रत्येक झाेनमध्ये ४ ट्रॅक्टर, एक टिप्पर

मनपाकडे मालकीचे १६ ट्रॅक्टर व ५ टिप्पर आहेत. आयुक्तांनी भाडेतत्त्वावरील ट्रॅक्टर बंद केल्यानंतर प्रत्येक झाेनमध्ये ४ ट्रॅक्टर व दिमतीला एका टिपरची व्यवस्था केली. परंतु, प्रत्येक झाेनचे भाैगाेलिक क्षेत्रफळ व पावसाच्या दिवसांत कचऱ्याच्या समस्येत वाढ हाेत असल्याने ही पर्यायी व्यवस्था अत्यंत ताेकडी ठरत असल्याचे समाेर आले आहे.

४८ कुलींची नियुक्ती केली पण...

मनपाच्या विविध विभागांत दडून बसलेल्या तब्बल ४८ पेक्षा अधिक कुलींचा शाेध घेऊन त्यांची कचरा उचलण्याच्या कामासाठी झाेननिहाय नियुक्ती करण्यात आली. सुटाबुटात व जिन्स पँटमध्ये वावरणारे कुली नियुक्त झाले खरे, पण ट्रॅक्टरवर कचरा उचलण्यासाठी त्यांनी ठेंगा दाखविल्याची माहिती आहे.