गायगाव मार्गावर धुळीचे साम्राज्य
अकोला: गायगाव मार्गाचे निर्माणकार्य संथगतीने सुरू रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती व धूळ आहे. याचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वारांना होत आहे. या मार्गवर सर्वसाधारण वाहतुकीसह जड वाहतूकही सुरू असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
अकोला: वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांचा धोका वाढला आहे. अशातच शहरातील विविध भागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरियाचाही धोका वढला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी बाळगण्याचे आवाहन डॉक्टरांमार्फत केले जात आहे.
जीएमसीत रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांची संख्या वाढली असून यामध्ये अनेक रुग्ण बाहेरगावातील आहेत. अशा रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांची सर्वोपचार रुग्णालय परिसरात गर्दी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
ज्येष्ठांनी घ्यावा चौकस, ताजा व हलका आहार!
अकोला: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात जुन्या व्याधींनी ग्रस्त आणि वयस्क ज्येष्ठ नागरिकांच्या आहार आणि दिनचर्येची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. ज्येष्ठ नागरिक बाधितांच्या संपर्कात आल्यास त्यांना लवकर लागण होण्याची भीती आरोग्यतज्ज्ञ व्यक्त करतात