शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

वर्तमानपत्रांसदर्भात कोणतेही निर्बंध नाहीत! - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:09 AM

खोटा संदेश पसरविणाऱ्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदविण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर वृत्तपत्रांसदर्भात कोणतेही निर्बंध आणले नाही, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.दोन दिवसांपूर्वी अकोला जिल्हाधिकारी यांच्या नावाने व जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसारित केला आहे, असे भासवून एक खोटा संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामध्ये वृत्तपत्रांसदर्भात जिल्हाधिकारी यांनी निर्बंध आणले असल्याचे म्हटले होते; मात्र हा संदेश सपशेल खोटा असून, असा कुठलाही आदेश काढला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनीच माध्यमांना दिली. विशेष म्हणजे असा खोटा संदेश पसरविणाऱ्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदविण्यात आली आहे.बुधवारी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी पापळकर यांनी कोरोनाच्या विरोधातील लढा हा सर्वांच्या साथीने व सहकार्याने लढायचा आहे, त्यामुळे खोटी माहिती व अफवा टाळण्याची गरज व्यक्त केली. वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेपर्यंत योग्य त्या सूचना जात असून, कोरोनाविरोधात जनजागृती करण्यासाठी वर्तमानपत्रांचे मोठे सहकार्य असल्याचे नमूद केले आहे. ते म्हणाले की सध्या लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचली पाहिजे, घाबरून जाण्यापेक्षा काळजी घ्या, घराबाहेर पडू नका. कोरोनाच्या विरोधातील युद्ध आपल्याला जिंकायचे आहे, त्यामुळे खोट्या अफवांना बळी पडू नका आणि कोणी पसरवित असेल तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. दरम्यान, या खोट्या संदेशाविरोधात जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी सिटी कोतवाली परिसरात तक्रार नोंदविली असून, हा संदेश कोणी पसरविला, याचा शोध सुरू झाला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस