शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रस्त्याची दुरुस्ती नाहीच; उड्डाणपुलाचे काम अकोलेकरांच्या जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 3:01 PM

खदान पोलीस ठाणे ते थेट रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता अकोलेकरांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे.

अकोला: शहरातील निर्माणाधिन उड्डाणपुलाचे काम सर्वसामान्य अकोलेकरांच्या जीवावर उठले आहे. २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणीच्या दिवशी भाजपचे लोकप्रतिनिधी स्वत:च्या राजकीय भवितव्याची चिंता करीत असताना उड्डाणपुलालगतच्या रस्ता दुरुस्तीला ठेंगा दाखवणाºया कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील एका तरुणाचा ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतरही कंत्राटदाराने रस्ता दुरुस्तीला सुरुवात केली नाही आणि भाजप लोकप्रतिनिधींनासुद्धा या गंभीर प्रकाराची दखल घ्यावीशी वाटली नसल्याने उड्डाणपुलाचे काम आणखी किती निष्पाप अकोलेकरांचा बळी घेणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.प्रशस्त रस्ते, उड्डाणपुलामुळे शहराच्या विकासाला चालना मिळते, यात दुमत नाही; परंतु विकास कामांना प्रारंभ करण्यापूर्वी नियोजन आणि पर्यायी उपाययोजनांची काटेक ोरपणे अंमलबजावणी आवश्यक ठरते. शहरातील विकास कामांचा भाजपच्या स्तरावर गवगवा केला जात असला तरी प्रत्यक्षात पर्यायी उपाययोजनांकडे साफ कानाडोळा केला जात असल्याची परिस्थिती आहे. प्र्रशस्त रस्ते निर्मितीच्या नावाखाली शहरात एकाच वेळी सर्व मुख्य रस्त्यांचे खोदकाम केल्या जात असल्यामुळे वाहतूक व्यवस्था पार कोलमडून गेली आहे. खदान पोलीस स्टेशन ते अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंत उड्डाणपुलासाठी खोदकाम केल्या जात आहे. खोदकामादरम्यान मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याची परिस्थिती आहे. उड्डाणपुलाचे काम करणाºया कंत्राटदारानेच रस्त्याची दुरुस्ती करणे भाग असून, निविदेतही रस्ता दुरुस्तीचा समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून उड्डाणपुलासाठी खोदकाम करणाºया कंत्राटदाराने पैसे वाचविण्याच्या मानसिकतेतून रस्ता दुरुस्तीकडे सपशेल पाठ फिरवल्यामुळे खदान पोलीस ठाणे ते थेट रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता अकोलेकरांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे.वजनदार ‘सेठ’मुळे भाजपची चुप्पीशहराचा विकास व्हावा, या उदात्त उद्देशातून आमदार गोवर्धन शर्मा यांनी उड्डाणपुलासाठी शासनाकडे रेटा लावून धरला होता. त्यानुषंगाने शासनाने १६७ कोटी रुपये मंजूर केले. उड्डाणपुलाचे काम नागपूर येथील कंपनीमार्फत केल्या जात असले तरी प्रत्यक्षात भाजपमधील स्थानिक वजनदार ‘सेठ’ची भागिदारी असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून रस्ता दुरुस्तीसाठी प्रत्यक्षात पुढाकार घेतला जाईल का, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचा इशारा; तरीही निकृष्ट कामखदान पोलीस स्टेशन ते रेल्वे स्टेशनपर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. निर्माणाधिन उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याची चाळण झाल्यामुळे अकोलेकरांना वाहन चालविणे मुश्कील झाले आहे. ही बाब लक्षात घेता शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी मध्यंतरी संबंधित कंत्राटदाराला रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर थातूरमातूर डांबराचा निकृष्ट थर अंथरण्यात आल्याचे समोर आले.

कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराच्या काँग्रेस नगरमधील एका निष्पाप तरुणाचा बळी गेला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात न केल्यास उड्डाणपुलाचे काम बंद केले जाईल.-राजेश मिश्रा शहर प्रमुख शिवसेना 

 

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग