सचिन राऊत अकोला : कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रातील असल्याने कडक संचारबंदीमुळे राज्यावर आर्थिक संटक आल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या दरवर्षी होणाºया प्रशासकीय तसेच विनंतीवरूनच्या बदल्या होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एक वर्षासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना आहे त्या ठिकाणीच सेवेत राहण्याचे सांगण्यात आल्यामुळे पोलीस अधिकाºयांमध्ये ‘कही खुशी कही गम’चे वातावरण आहे.कोरोनाच्या फटक्यामुळे या वर्षात राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह शासनाच्या कोणत्याही विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवास भत्त्यासह विविध भत्ते संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना देण्याची आवश्यकता राहणार नसून, तिजोरीवर खर्चाचा ताण येणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या पोलीस अधिकाºयांना जिल्ह्याच्या बाहेर बदली हवी होती, त्यांना एक वर्ष त्याच ठिकाणी थांबावे लागणार असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे, तर ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला; मात्र तरीही बदली नको होती, अशा पोलीस अधिकारी व कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील ३२ अधिकाºयांचे प्रयत्नअकोला जिल्हा पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत असलेल्या ८ ते १० पोलीस अधिकाºयांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना जिल्ह्याबाहेर बदली होणार होती. सुमारे २५ अधिकाºयांनी अकोल्यात राहण्यास अनुत्सुकता दाखवित जिल्ह्यातून आवडीच्या ठिकाणी बदली मिळावी म्हणून अर्ज केले होते; मात्र आता या सुमारे ३२ अधिकाºयांच्या बदल्याच होणार नसल्याची माहिती समोर आल्याने त्यांच्यात ‘कही खुशी कही गम’चे वातावरण आहे.अन्य विभागाच्याही बदल्या नाहीत!पोलीस प्रशासनासह महसूल, विधी व न्याय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, अन्न व औषध प्रशासन विभाग, कृषी विभाग यांच्यासह शासनाच्या विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या एक वर्ष बदल्या होणार नसल्याची माहिती आहे. या अधिकारी व कर्मचाºयांना आहे त्या ठिकाणीच एक वर्ष कामकाज करावे लागणार आहे.
‘कोरोना’मुळे बदल्या नाहीत; पोलिसांमध्ये संमिश्र भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 3:01 PM