अकोला : निंभोरा येथील कोल्हापुरी बंधाºयाच्या कामासाठी जलसंधारण विभागाला ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याचा ठरावाला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद लघुसिंचन विभागांतर्गत अकोला तालुक्यातील निंभोरा येथे कोल्हापुरी बंधाºयाचे काम जलसंधारण विभागामार्फत करण्यात येणार आहे. बंधाºयाच्या कामासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाला ना-हरकत प्रमाणपत्र देण्याच्या ठरावाला सभेत मंजुरी देण्यात आली. जलव्यवस्थापन समितीच्या मागील सभेच्या इतिवृत्ताला या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, शिक्षण व अर्थ सभापती पुंडलिकराव अरबट, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड, समितीचे सदस्य श्रीकांत खोने, सरला मेश्राम, गोपाल कोल्हे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.२.६३ कोटींच्या बंधाºयाची सिंचन क्षमता ३४ हेक्टर!निंभोरा येथे २ कोटी ६३ लाख रुपयांचे कोल्हापुरी बंधाºयाचे काम जलसंधारण विभागामार्फत करण्यासाठी ‘एनओसी’ देण्याचा ठराव जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. या कोल्हापुरी बंधाºयाची सिंचन क्षमता ३४ हेक्टर प्रस्तावित करण्यात आली आहे.