शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत नोएल संघाला अजिंक्यपद

By admin | Published: January 29, 2015 11:38 PM

अकोला येथे लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा; अकाश हेडाऊ विजयाचा शिल्पकार.

अकोला: श्री नाना उजवणे मंडप कॉन्ट्रॅक्टर अँन्ड डेकोरेशन प्रस्तुत पहिल्या लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद नोएल इंग्लिश हायस्कूलने पटकाविले. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर गुरुवारी नोएल इंग्लिश हायस्कूल व माऊंट कारमेल हायस्कूल संघात सामना खेळला गेला. नोएलने ७ गडी राखून हा सामना जिंकला.माऊंट कारमेलने प्रथम फलंदाजी करीत १५ षटकात ८ बाद १0१ धावा काढल्या. अभी बिलाला याने सर्वाधिक २८ धावा संघाच्या खात्यात जमा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना नोएलच्या सलामीचा फलंदाज आकाश हेडाऊ याने चांगली सुरुवात केली. आकाशने ८ चौकारांसह नाबाद ५६ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. नोएल स्कूलने ३ गड्यांच्या मोबदल्यात १३ व्या षटकातच विजयी लक्ष्य पूर्ण करीत स्पर्धेच्या अजिंक्यपदावर ताबा घेतला. सामनावीर आकाश हेडाऊ ठरला. *बक्षीस वितरणसामना समाप्तीनंतर लगेच बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. विशेष अतिथी अकोला महानगरपालिका उपायुक्त माधुरी मडावी होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह्यलोकमतह्णचे निवासी संपादक रवी टाले होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री नाना उजवणे मंडप कॉन्ट्रॅक्टर अँन्ड डेकोरेशनचे संचालक तथा स्पर्धा प्रायोजक नाना उजवणे, पॅरामाऊंट स्पोर्टसचे संचालक जावेद अली, अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर, माजी रणजीपटू नंदू गोरे, अशोक ढेरे, नोएल इंग्लिश स्कूलचे संचालक अनुल मनवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेता नोएल स्कूल व उपविजेता माऊंट कारमेल संघाला आकर्षक ह्यलोकमतह्ण करंडक देण्यात आला. जावेद अली यांच्यातर्फे मालिकावीर पुरस्कार व संकेत डिक्कर याला महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल बॅट देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेला सहयोग फायनान्स ग्रूप, पॅरामाऊंट स्पोटर्स, अकोला क्रिकेट क्लब यांचे सहकार्य लाभले.*'लोकमत'चा चांगला उपक्रमह्यलोकमतह्ण समूहाने शहरातील नवोदित क्रिकेटपटूंसाठी स्पर्धेचे आयोजन केले, हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. खेळाडू हा न्याय आणि अन्याय यामध्ये फरक जाणतो. या गुणामुळेच न्यायाने वागून एक उत्तम नागरिक म्हणून जगतो. अशा खेळाडूवृत्तीच्या नागरिकांची देशाला गरज असून, असे नागरिक खेळ स्पर्धांंमधून घडत असतात, असे मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी मत व्यक्त केले.