अकोला, दि. १0- भाजपाच्या महापौर उज्जवला देशमुख यांना उमेदवारी नाकारून पक्षश्रेष्ठींनी रामदासपेठेतील सारिका जयस्वाल यांना उमेदवारी दिल्याने महापालिका प्रभाग क्रमांक ६ भाजपा नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. तीन नगरसेवक, विविध पक्ष, संघटनेचे चार पदाधिकारी आणि माजी महापौर सुरेश पाटील या प्रभागातून निवडणूक रिंगणात आहेत. तर येथील तीन प्रवर्गात भारिप-बहुजन महासंघाने कुणालाही उमेदवारी दिलेली नाही.देशमुख फैल, मनकर्णा प्लॉट, स्कायलार्क हॉटेल, रामदासपेठ परिसर असलेल्या या प्रभागात मराठा, व्यापारी आणि भाजपा विचारांचा प्रभाव आहे. अनुसूचित महिलांसाठी राखीव असलेल्या ह्यअह्ण प्रवर्गात काँग्रेस, भाजप, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि दोन अपक्ष असे ६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भारिप बहुजन महासंघाने येथून उमेदवार दिलेला नाही. इतर मागासवर्गीय पुरुषांसाठी राखीव असलेल्या ह्यबह्ण प्रवर्गात शिवसेनेकडून तरुण बगेरे, भाजपकडून राहुल देशमुख, राष्ट्रवादीकडून देवानंद ताले, काँग्रेसकडून माजी महापौर सुरेश पाटील हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या ह्यकह्ण प्रवर्गातून भाजपच्या महापौर उज्जवला देशमुख यांना उमेदवारी नाकारली गेली. त्याऐवजी रामदासपेठेतील सारिका टोलू जयस्वाल यांना भाजपने उमेदवारी दिली. दरम्यान, भाजपातूनच दुखावलेले मयूर विखे यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर येथून निवडणूक रिंगणात आहेत. महिला काँग्रेसच्या पदाधिकारी जयश्री भुईभार यासुद्धा लढतीमध्ये असून येथे अपक्ष उमेदवार नाही. ह्यडह्ण प्रवर्गात भाजप नगरसेवक राजेंद्र गिरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पवन महल्ले यांच्यासह काँग्रेस, सेना आणि भारिपने उमेदवार टाकले आहेत. एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात असून यापैकी तीन अपक्ष आहेत. कधी काळचे सुरेश पाटील यांचे कट्टर सर्मथक असलेले महल्ले भाजपच्या उमेदवाराशी लढत देणार आहेत.
उमेदवारी नाकारल्याने महापौरांचा प्रभाग प्रतिष्ठेचा
By admin | Published: February 11, 2017 2:30 AM