अकाेला : पावसाळ्यापूर्वी ११० फुट रुंद कॅनाॅल जमिनीचे हस्तांतरण हाेउन दर्जेदार रस्ता तयार हाेइल, ही अकोलेकरांची अपेक्षा फाेल ठरली आहे. महापालिका,जिल्हाप्रशासन व पाटबंधारे विभागाच्या लालफितशाहीत कॅनाॅल रस्ता रखडला आहे. पावसाळ्यात नागरिकांच्या राेषाचा सामना करावा लागण्याची शक्यता, पाहता आता कॅनाॅलच्या एका बाजूने अवघा २० फुट रूंद सर्विस रस्त्याचे खडीकरण केले जाणार असल्याची माहिती आहे. जुने शहरातील डाबकी राेड अत्यंत अरुंद असल्यामुळे या भागात वाहतूक काेंडीच्या समस्येत भर पडली असून डाबकी राेडला पर्यायी रस्त्याची गरज निर्माण झाली. यातूनच कॅनाॅल रस्त्याचा पर्याय समाेर आला. संत गाेराेबा मंदिर ते मेहरे नगर ते बाळापूर राेड तसेच थेट शिवसेना वसाहतमधून राष्ट्रीय महामार्गा पर्यंत हा रस्ता झाल्यास डाबकी राेडवरील वाहतुक व्यवस्थेवरील ताण कमी हाेणार असल्याने मनपा प्रशासनाने २०१२ मध्ये पहिल्यांदा या रस्त्यासाठी निविदा प्रसिध्द केली हाेती. त्यानंतर २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी कॅनाॅल जमिनीचे सातबारा व फेरफार नाेंदीचे काम हाती घेतले हाेते. ही क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मनपाच्या सर्वसाधारण सभेत कॅनाॅल रस्त्याचा ठराव मंजूर करून घेत शासनाकडे सादर केला हाेता. यानंतर ही प्रक्रिया थंडबस्त्यात गेली. मध्यंतरी ही जमिन हस्तांतरित करण्याचा तिढा जिल्हाप्रशासनाच्या दालनात गेला हाेता. परंतु आजपर्यंतही ११० फुट रुंद कॅनाॅल जागेच्या हस्तांतरणाचा तिढा कायम असल्याचे दिसत आहे.
तांत्रिक त्रुटी कायमकॅनाॅल जमिन हस्तांतरणाच्या मुद्यावरुन जिल्हाप्रशासन व मनपा प्रशासनाने तांत्रिक त्रुटी निकाली काढणे अपेक्षित हाेते. पावसाळ्यात नागरिकांचे हाल हाेतील, हे ध्यानात घेऊन केवळ एका बाजूने २० फुट रुंदीचे खडीकरण केले जाइल. यासाठी मनपाने निविदा मंजूर करीत कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिले आहेत.
कॅनाॅलचा मध्य (सेंटर) काढला कसा?रेणूका नगरच्या बाजूने अधिकृत लेआऊट असून मेहरे नगरच्या बाजूने गुंठेवारी जमिन आहे. मनपाच्या नगररचना विभागाने लेआऊट गृहीत धरुन त्यापुढे सुमारे ३० मीटरची जमिन कॅनाॅलची असल्याचे सांगत सर्विस रस्ता तयार करण्यासाठी मध्य (सेंटर) काढला. हा प्रकार पाहता एकाच बाजूने सर्विस रस्ता कसा, असा सवाल उपस्थित झाला आहे.