शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शेतकर्‍यांच्या मरणालाही किंमत नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:43 AM

शेतकरी आर्थिकरित्या तर भरडला जातोच, त्यांना मृत्यूचाही सामना करावा लागतो; परंतु शासनदरबारी शेतकर्‍यांच्या मृत्यूची किंमत मात्र कवडीमोल आहे, असा सूर शुक्रवारी लोकमततर्फे आयोजित परिचर्चेत शेतकरी, अभ्यासकामध्ये उमटला.

ठळक मुद्दे शेतकरी, अभ्यासकांचा लोकमत परिचर्चेत उमटला सूर

अकोला : कीटकनाशके फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांचे मृत्यू झाले. पण, शासन अद्याप त्याबाबतीत तेवढे गंभीर नाही. आता कुठे विशेष तपासणी पथक (एसआयटी) नेमली.  अकोल्यात एसआयटीची चमू दाखल झाली असून, शुक्रवारपासून त्यांनी चौकशीला सुरुवात केली. ही एसआयटी त्यांचा अहवाल कधी व केव्हा देईल,ते तेव्हा कळेलच, पण शेतकर्‍यांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठय़ा शहरात मृत्यूची घटना घडली, तर आर्थिक मदतीचा आकडा दहा लाखांपर्यंत असतो, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यांचा मृत्यू मात्र स्वस्त, म्हणजे शेतकर्‍यांच्या मृत्यूलाही किं मत नाही का? अकोल्यात कोट्यवधी रुपयांची अप्रमाणित, नोंदणीच नसलेली कीटकनाशके जप्त करण्यात आली. यात जीवितास हानीकारक कीटकनाशकांचा भरणा अधिक होता, ही कीटकनाशके आली कशी आणि यातील विकली किती, याचा शोध एसआयटी घेईल का?  शेतकरी अधिक पीक मिळावे, उत्पन्न वाढले तर कर्ज फेडता येईल, या आशेने  शेतात राबतो, किडीपासून पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करतो, पण त्याला बाजारात येणार्‍या नवनवीन औषधांची माहिती नसल्याने तो बळी ठरतो, कृषी विभाग, कृषी विद्यापीठे शेतकर्‍यांना याबाबतीत प्रशिक्षण, मार्गदर्शन करण्यात असर्मथ ठरत असल्याने शेतकरी यासर्व यंत्रणेच्या कचाट्यात सापडला आहे. उद्योजकांना त्यांची औषधे विकायची आहेत. ज्या औषधावर जास्त नफा मिळतो,ती औषधे मोठय़ा प्रमाणावर विकली  जातात. यात मात्र शेतकरी आर्थिकरित्या तर भरडला जातोच, त्यांना मृत्यूचाही सामना करावा लागतो; परंतु शासनदरबारी शेतकर्‍यांच्या मृत्यूची किंमत मात्र कवडीमोल आहे, असा सूर शुक्रवारी लोकमततर्फे आयोजित परिचर्चेत शेतकरी, अभ्यासकामध्ये उमटला.

पारंपरिक पिके सोडून देशातील शेतकर्‍यांनी हरितक्रांती घडविली, देशातील उत्पादन वाढावे, यासाठी शेतकर्‍यांनी, संकरित, बीटी असे नवे तंत्रज्ञान वापरू न पिके घेतली, पण अलीकडे हेच तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या मुळावर उठले. पिकावर आलेल्या वेगवेगळ्य़ा किडींचा प्रादुर्भाव कमी करू न उत्पादन घेण्यासाठीचा प्रयत्न शेतकरी करतोय, तथापि यात शेतकर्‍यांची सर्रास लूट सुरू  आहे. कीटकनाशक  कंपन्या, शासन कृषी विभागाचा समन्वय नाही, कंपन्यांच्या भल्यासाठी वाट्टेल त्या प्रकारची कीटकनाके शेतकर्‍यांच्या माथी मारली जात आहेत. त्यातूनच जीवघेणे प्रकार घडत आहेत. पंरतु, कोणालाच  शेतकर्‍यांच्या मृत्यूची किंमत नसल्याचे एकूण चित्र आहे.आता आमचे एसआयटीच्या अहवालाकडे डोळे लागले आहे.- मनोज तायडे,  जिल्हा संयोजक,  शेतकरी जागर मंच, अकोला.

शेतकरी स्वाभिमानाने जगण्यासाठीचा संघर्ष करीत आहे. पण, दुसरीकडे शासन उद्योजकांच्या संगनमताने, शेतकर्‍यांना वेठीस धरत आहे. उद्योजकांचे उद्योग चालावेत, यासाठी सर्वच शेतीपयोगी निविष्ठांचे दर गगनाला भिडले. महागडी कीटकनाशके शेतकर्‍यांच्या माथी मारली जात आहे. हे कॉन्टॅक विष आहे. पण, सर्रास विकण्यात येत आहे. उत्पादनवाढीच्या भाबळ्य़ा आशेपोटी शेतकरी त्याला बळी ठरत आहेत. पण, कृषी विभाग व संबंधित यंत्रणेचे जाणीवपूवर्क दुर्लक्ष होत असल्याने हा धंदा फोफावला आहे.- अविनाश नाकट पाटील, जिल्हाध्यक्ष, युवा शेतकरी संघटना, अकोला.

शासनाचा उलटाच कायदा आहे म्हणे, फवारणीने मृत्यू झाल्यास जबाबदारी शेतकर्‍यांची राहील, म्हणजे संबंधित यंत्रणांना पाठीशी घालून, विनापरवाना, जहाल औषधी विक्रीसाठीची मोकळीक द्यायचा हा प्रकार आहे. औषधे मानकाप्रमाणे आहेत की नाहीत, हे न बघता शेतकर्‍यांना जबाबदार धरणे म्हणजे, जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे.-ज्ञानेश्‍वर गावंडे, शेतकरी

जिल्हय़ात सात शेतकरी, शेतमजुरांचा कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झाला. त्यानंतर एसआयटी गठित करण्यात आली. ही एसआयटी अकोल्यात तीन दिवस राहील. त्याकडे आमचे लक्ष आहे. खरे तर जीविताला हानीकारक ठरणारी विनापरवाना कीटकनाशके सापडत असतील, तर केवळ जप्त करणे हीच कारवाई आहे का,अशा लोकांवर कडक कारवाई का केली जात नाही, हा प्रश्न आहे.- ज्ञानेश्‍वर सुलताने, शेतकरी.

फवारणी करणार्‍या शेतकरी, शेतमजुराचा विमा काढणे अनिवार्य आहे. फवारणीमुळे विषबाधा झाल्यास रुग्णालयात विमा कार्ड दाखवताच उपचार सुरू  व्हावेत, या अगोदर जिल्हय़ात शेतकर्‍यांनी विमा काढला होता त्याचा एकाही शेतकर्‍यांना फायदा झाला नाही. तसेच कीटकनाशके फवारणीबाबत शेतकर्‍यांना प्रशिक्षण देणे गरजेचे असते, पण ते केलेच नाही, आता कृषी विभागाला जाग आली. ही वेळच येऊ नये, यासाठी विनापरवाना व जहाल कीटकनाशकावर बंदी घालावी.- अंकुश तायडे, पंकज तायडे, शेतकरी. 

शेतकर्‍यांच्या मृत्यूलाही किंमत उरली नाही. मृत्यू-मृत्यूतही भेदभाव केला जात आहे. मोठय़ा शहरात मृत्यू होत असेल, त्यांची किंमत दहा लाख; पण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी, शेतमजुरांची किंमतच नाही, हे मुंबईतील घटनेवरू न सिद्ध होत आहे. कीटकनाशकांच्या विक्रीचा परवाना नसताना ती येतात आणि विकली जातात, हे आश्‍चर्यच नव्हे का? म्हणजे हे संबंधित यंत्रणेला माहीत नसावे, ही किती मोठी शोकांतिका आहे.- कृष्णा अंधारे, कृषी अभ्यासक, अकोला. 

टॅग्स :Farmerशेतकरी