बार्शिटाकळ : तालुक्यातील साखरविरा येथील अतिक्रमित आश्रमशाळा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जनता ज्ञानोपासक मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकाऱ्यांना सुनावणीसाठी नोटीस बजावली आहे.
तालुक्यातील साखरविरा येथील गावठान जमिनीवर अतिक्रमण करून सुमनताई मखरामजी पवार यांनी जनता ज्ञानोपासक मंडळ, लोहगडद्वारा संचालित विमुक्त जाती, भटक्या जमाती प्राथमिक आश्रमशाळा व वसराम नाईक आडे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा साखरविरा येथे चालविण्यासाठी भाड्याने दिली आहे. ही बाब गैरकायदेशीर असल्याची तक्रार अविनाश किसनराव राठोड यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यानुषंगाने जिल्हा अधिकाऱ्यांनी या प्रकरणी ४ ऑगस्ट रोजी ११ वाजता त्यांच्या दालनात साखरविरा ग्रामपंचायतचे सरपंच, सचिव जनता ज्ञानोपासक मंडळ लोहगडचे मखरामजी पवार, अविनाश पवार, सतीष पवार, संध्यामोहन सिंग राठोड, सुमन मखरामजी पवार, वर्षा अविनाश पवार, सारिका राजकुमार चव्हाण, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ए. जे. धोत्रे, गटविकास अधिकारी पंचायत समिती बार्शिटाकळी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद अकोला यांना उपस्थित राहण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.