शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

मालमत्तांच्या नोटीस; अर्ज भरून देण्यासाठी सेवा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 4:14 PM

या उपक्रमामुळे नागरिकांना काही अंशी का होईना, दिलासा मिळणार आहे.

अकोला : महापालिका प्रशासनाने अकोलेक रांना मालमत्तांच्या सुधारित नोटीस जारी केल्या. त्यासोबत जोडलेला अर्ज भरताना नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता प्रभाग क्रमांक १२ मधील राजपुतपुरा येथील श्री विघ्नहर्ता परिवार, भाजपमध्ये मंडळाच्या वतीने उद्या ६ मार्चपासून अर्ज भरून देण्यासाठी नागरिक सेवा केंद्र सुरू केले जाणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना काही अंशी का होईना, दिलासा मिळणार आहे.महापालिकेने १८ वर्षांनंतर प्रथमच २०१६ मध्ये संपूर्ण शहरातील मालमत्तांचे ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे सर्वेक्षण करून मालमत्ता दरात वाढ केली. ही वाढ अवाजवी असल्याचा आरोप करीत काँग्रेस, शिवसेना, भारिप-बमसंच्यावतीने विविध आंदोलने छेडण्यात आली होती. करवाढीच्या मुद्यावर काँग्रेसचे नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी नागपूर हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी पार पडली असता, द्विसदस्यीय खंडपीठाने मनपाची सुधारित दरवाढ रद्द करण्याचे निर्देश देत २००२ ते २०१७ या कालावधीत लागू असलेले जुने दर कायम ठेवण्याचे नमूद केले. तसेच मालमत्तांचा भाडेमूल्यावर आधारित सुधारित सर्व्हे करण्याचे निर्देश दिले. त्यानुषंगाने मनपाने अकोलेकरांना पुन्हा नोटीस जारी केल्या. त्यासोबत अर्ज पाठविण्यात आला. अर्जातील क्लिष्ट वाक्य पाहता सर्वसामान्य अकोलेकरांचा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांचे अर्ज भरून देण्यासाठी प्रभाग १२ मधील श्री विघ्नहर्ता परिवार व भाजप मध्य मंडळाच्यावतीने सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सेवा पूर्णत: नि:शुल्क दिली जाणार आहे.उद्यापासून सेवा केंद्र कार्यान्वितप्रभाग क्रमांक १२ मधील राजपुतपुरा, खोलेश्वर, अनिकट, राधाकिसन प्लॉट, आळशी प्लॉट, पत्रकार कॉलनी आदी भागातील रहिवाशांसाठी उद्या ६ मार्चपासून दररोज सायंकाळी ६.३० ते ८ पर्यंत संजय गोटफोडे, संभव अपार्टमेंटसमोर, राजपुतपुरा येथे नागरिकांच्या समस्यांचे समाधान करून त्यांचे अर्ज नि:शुल्क भरून दिल्या जाणार आहेत. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका