शराफत अली याच्यावर यापुर्वी जबर दुखापत, दंगल, बेकायदेशीररीत्या शस्त्र
बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी
देणे, गृहअतिकमण, प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत तसेच हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापूर्वी विविध कलमांन्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, त्याच्याविरुध्द गंभीर दखल घेण्यात येऊन कुख्यात गुंड शराफत अली बरकत अली याच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरिता पोलीस अधीक्षकांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर त्यास एक वर्षाकरिता जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश २५ मे रोजी दिला.