अकाेला शहर व जिल्हाभरात नाभिक समाज बांधवांची जवळपास १९०० दुकाने आहेत. शहरातील दुकानांचीच संख्या ७०० पर्यंत आहे. शहरातील अनेक दुकानदारांनी भाड्याने दुकाने घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. तर काहींनी कर्ज घेऊन मालकीची दुकाने घेतली आहे. शहरात त्यांचे हक्काचे घरही नाही. त्यामुळे घरभाड्याचा बाेजा आहेच, आता तर व्यवसायच ठप्प झाल्याने उदरनिर्वाहासाठीच आवश्यक पुंजी ही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे हे नवे लाॅकडाऊन नाभिकांसाठी माेठे त्रासदायक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी ‘लाेकमत’ शी बाेलताना दिल्या.
काेट
नाभिक समाजाचे हातावर पाेट आहे. मागच्या लाॅकडाऊनच्या नुकसानामधून अजून आम्ही सावरलाे ही नाही ताेच दुसरे लाॅकडाऊनचे संकट आले आहे. शासनाने पॅकेजची घाेषणा करावी, नाहीतर दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी तरी द्यावी. आम्ही संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या संपर्कात आहाेत त्यांच्याकडून निर्देश आल्यानंतर भूमिका ठरवू
गजानन वाघमारे जिल्हाध्यक्ष नाभिक समाज दुकानदार संघटना ..................................दरराेज व्यवसाय केला तरच आमचे घर चालते, संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून आहे, उदरनिर्वाहाचा खर्च, दुकानाचे भाडे काेठून उभे करायचे. इतर व्यवसायामुळे काेराेना हाेत नाही आणी आमच्यामुळेच हाेताे का?
प्रकाश अंबुस्कर, सलून व्यावसायिक..........................................
लाॅकडाऊन लावा हरकत नाही, पण प्रत्येक सलून धारकाला लाॅकडाऊनच्या काळात किराणा, वीजबिल व दुकान भाड्यांची तरतूद सरकारने करावी तसचे त्यांच्या घरातील प्रत्येकाला लस देण्याची व्यवस्था करावी नाहीतर दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी
अनंता काैलकार सलून व्यावसायिक........................
दुकान भाड्याचे आहे. लाॅकडाऊनमुळे धंदा बसला, आता भाडे कसे भरायचे, हातावर पाेट असल्याने उदरनिर्वाहाचे काय हा प्रश्नच आहे. सरकार मानवतावादी विचार करत नाही
संदीप आंबुलकर सलून व्यावसायिक
........................
शहरातील एकूण दुकाने ७००
अवलंबून असलेल्यांची संख्या ४००० हजार
........................
भाडे कसे भरायचे
अनेक व्यावसायिकांची दुकाने भाड्याची आहेत. आता व्यवसायच ठप्प झाल्यामुळे भाडे कसे भरायचे ही चिंता आहेच. शिवाय ज्यांनी कर्ज घेऊन दुकानांची खरेदी केली आहे. त्यांना कर्जाचा हप्ता कसा भरायचा ही चिंता सतावत आहे.