अकोला: तूर पिकावर आता हेलीकोव्हर्पा (शेंगा पोखरणारी अळी)आर्मीजेरा अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. हे पीक सध्या काही ठिकाणी फुलोरा तर काही ठिकाणी शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. तथापि, या अळीचा त्वरित बंदोबस्त न केल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली दरम्यान,हेलीकोव्हर्पानंतर शेंगमाशी येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.तूर फुलोरा,शेंगा धरण्याच्या अवस्थेत असताना हेलीव्होकर्पा आर्मीजेरा या अळींचा प्रादुर्भाव होतो तसेच पिसारी पंतगही हीच संधी साधून आक्रमण करतो,सद्या या दोन्ही अळ््यांचा प्रादुर्भाव तुरीवर दिसून येत आहे. हेलीकोव्हर्पा तुरीच्या फुलांवर खसखसीसारखी पांढरी अंडी टाकतात,तीन दिवसात यातील अळी फुलोर व नवीन येणाऱ्या शेंगात प्रवेश करू न शेंगा पोखरतात. फुलोरा ,नवीन पोखरलेल्या शेंगा गळून पडतात, परिणामी पिकांचे प्रचंड नुकसान होते.या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकºयांनी शेताचे सर्वेक्षण करावे.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शिफारशीनुसार किटकनाशकांची फवारणी करण्याची गरज आहे.किडीचा जेथे प्रादुर्भाव असेल तेथील शेतकºयांनी शेताचे निरीक्षण करावे, किंवा ४० ते ५० टक्के पीक फुलोºयावर आल्यानंतर पहिली फवारणी निंबोळी अर्क पाच टक्के फवारणी करावी. यामुळे हेलीव्होकर्पाचे नियंत्रण होऊन नैसर्गिक शत्रू किटकांना अपाय न होता हेलीकोव्हर्पा चे नियंत्रण करण्यास मदत होईल. यावर्षी,सर्वच पिकांवर परिणाम झाले पंरतु तूर पीक सद्या जोरात आहे. तथापि या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला असून, शेंगमाशी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दररोज शेताचे सर्वेक्षण करू न शेतकºयांनी काळजी घेण्याची गरज आहे.
हेलीकोव्हर्पा आर्मीजेरा अळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी आढळून आला आहे.शेंगा भरण्याच्या अवस्थेत शेंगमाशी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.पण शेतकºयांंनी घाबरू न न जाता दरवर्षी येणाºया या अळीवर शिफारशीनुसार कीटकनाशक फवारणी केल्यास नियंत्रण मिळवता येते.- डॉ. अनिल कोल्हे,कृषी शास्त्रज्ञ,मुख्य पीक संरक्षण अधिकारी,डॉ.पंदेकृवि,अकोला.