शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नेट बँकिंग कळणारा आता साक्षर - प्राचार्य बी.जी. शेखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 9:24 PM

अकोला : यापुढे ज्यांना नेट बँकिंग व्यवहार कळतात ते साक्षर व इतर निरक्षर म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आता प्रत्येकाने हे ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. त्यासोबतच या क्षेत्रात होणार्‍या दुरुपयोगाविषयी सतर्क असले पाहिजे, असे प्रतिपादन अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.जी. शेखर यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देअकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यापुढे ज्यांना नेट बँकिंग व्यवहार कळतात ते साक्षर व इतर निरक्षर म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आता प्रत्येकाने हे ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. त्यासोबतच या क्षेत्रात होणार्‍या दुरुपयोगाविषयी सतर्क असले पाहिजे, असे प्रतिपादन अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.जी. शेखर यांनी मंगळवारी केले.अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने जिल्हय़ात सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. मंगळवार, २३ जानेवारी रोजी श्री शिवाजी महाविद्यालयात या विषयावर माध्यम, विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर होते. प्रमुख अतिथी म्हणून बी. जी. शेखर तसेच अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, एक्सीस बॅंकेचे सहायक उपाध्यक्ष निशिकांत उपाध्ये, श्री  शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. आर. इंगळे, वाहतूक शाखेचे  पोलीस  निरीक्षक  विलास पाटील, सायबर  गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष मीरसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. शेखर यांनी सामाजिक माध्यमाचे फायदे  तेवढेच  तोटे उदारणासह विषद केले. या समाज माध्यमाची माहिती सर्वांसाठी खुली असून, पोलिसांकडेदेखील ती उपलब्ध असते, त्यामुळे समाजात वितंडवाद होईल, अशा पोस्ट करणे टाळावे, तसेच या माध्यमातून होणारी फसवणूक कशी जिवावर बेतली जाते, घडलेली सत्य घटनांवर उदाहरणे दिली. आपला पासवर्ड, ओटीपी कदापि कुणाला देऊ नसे, असे आवाहन त्यांनी केले.राकेश कलासागर यांनी तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले, यामुळे जगाच्या सीमारेषा  पुसल्याचे सांगताना, हे तंत्रज्ञान जेवढे फायदेशीर आहे तेवढेच विघातक आहे. त्यामुळे यातून आपल्याला हवे असलेल्या ज्ञानाचाच उपयोग करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने काळजीपूर्वक समाज माध्यमाचा वापर करावा, संगणक, इंटरनेट, मोबाइल  तंत्रज्ञानाचा वापर करू न बँकेचे व्यवहार करताना, प्रत्येकाने काळजी घ्यावी, आपण थोडी जरी चूक केली तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे निनावी येणारे फोन, मेल, आदीबाबत नागरिकांनी सतर्क असले पाहिजे, असे ते म्हणाले. सायबर गुन्ह्यासंदर्भात त्यांनी विविध मुद्दे समजावून सांगितले.

उपाध्ये यांनी विविध प्रकारची फसवणूक कशी केली जाते, याची चित्रफितीद्वारे माहिती दिली. त्यांनी विशिंग, फिशिंग, व्हॉटसअँपद्वारे होणारी आर्थिक फसवणूक आदींची इत्थंभूत  माहिती दिली. विजयकांत सागर यांनी समाज माध्यमाचा वापर चांगल्या कामासाठी  करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासंदर्भात त्यांनी या माध्यमाचा  वापर करू न समाजमन कलुषित करण्याचा घडलेला  प्रकार कथन केला. त्यांनीच त्या प्रकरणाचा तपास केल्याचे सांगितले. पाटील यांनी उत्कृष्ठ संचालक व सायबर गुन्ह्याची विस्तृत माहिती विषद केली. डॉ. इंगळे यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Akola Police Head Quarterअकोला पोलीस मुख्यालयBanking Sectorबँकिंग क्षेत्रcyber crimeसायबर क्राइम