लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणाची उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकाेला, मूर्तिजापूर, अकाेट शहर प्रतिबंधात्मक क्षेत्र घाेषित केले आहे . या शहरांमध्ये २३ फेब्रुवारीपासून लाॅकडाऊनचे आदेश दिले असून हे आदेश आता ८ मार्चपर्यंत वाढविण्यात आले हाेते मात्र व्यापारी संघटनांसह इतर संघटनांनी लाॅकडाऊन शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे राेष व्यक्त केल्याने अखेर प्रतिबंधीत क्षेत्रातील लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले आहे ५ मार्च पासून साेमवार ते शुक्रवार दरराेज सकाळी ९ ते ५ पर्यंत सर्व अस्थापना खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून शनिवार व रविवार दाेन दिवस लाॅकडाऊन कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरूवारी दिले
पाॅंइटर
हाॅटेल मधून सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत पार्सलच मिळेल
सर्व पेट्रा्ेलपंप हे ५ वाजेपर्यंत खुले त्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी पाच पेट्राेलपंप रात्री ९ पर्यंत
लग्नासाठी २५ वऱ्हाडी ही अट कायमच
ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरिता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे, ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरिता परवानगी राहील.
सर्व प्रकारची शासकीय कार्यालये, बँका १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यांपैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील.
सर्व धार्मिक स्थळे पूर्णपणे बंदच
सर्व प्रकारच्या शैक्षणीक संस्था बंद राहतील.
सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील.
सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे या कालावधीत बंद राहतील.
बाॅक्स
कलम १४४ लागू
६ आणि ७ मार्च वगळता पुढील प्रत्येक शुक्रवारच्या रात्री ८ वाजेपासून तर साेमवारच्या सकाळी ६ वाजे पर्यंत संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत या दरम्यान मुक्त संचार करणाऱ्या नागरिकांवर कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे