अकोला: कोरोनाची लक्षणं नसतील, तर कोरोना रुग्णांना आता होम क्वारंटीनचा पर्याय जिल्हाधिकाऱ्यांनी खुला करून दिला आहे. यासंदर्भात ४ आॅगस्ट रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते.कोरोनाची लक्षणं नसतील, तर होम क्वारंटीनचा पर्याय राज्यभरातील रुग्णांना आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिला आहे; मात्र आतापर्यंत हा निर्णय अकोला जिल्ह्यात उपलब्ध नव्हता. त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत असून, काहींना हॉटेल्समध्ये आर्थिक फटका सोसावा लागत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ४ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी होम क्वारंटीनसंदर्भात परिपत्रक काढले. त्यानुसार, आता लक्षणं नसलेल्या तसेच घरी विलगीकरणाची सुविधा असलेल्या कोविड रुग्णांना आता होम क्वारंटीन होता येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाºयांमार्फत दोन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.तरच निवडता येईल हा पर्याय
- वैद्यकीय अधिकाºयांनी रुग्णास अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दलचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्यास.
- रुग्णाच्या राहत्या घरी अलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक.
- रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेले रुग्ण पात्र नाही. (उदा. एचआयव्ही, कर्करोग यांसारख्या दुर्धर आजाराचे रुग्ण)
- ६० वर्षांपेक्षा जास्त वय नसावे.
लक्षणे आढळताच घ्या वैद्यकीय मदत
- धाप लागणे किंवा श्वासोच्छवासास अडथळा होत असल्यास.
- आॅक्सिजन सॅचुरेशनमध्ये कमतरता.
- छातीमध्ये सतत दुखणे किंवा वेदना होणे.
- संभ्रमावस्था किंवा शुद्ध हरपणे.
- अस्पष्ट वाचा किंवा झटके येणे
- हात किंवा पायामध्ये कमजोरी किंवा बधिरता येणे
- ओठ किंवा चेहरा निळसर पडणे
दहा दिवसांचे गृह अलगीकरणलक्षणे नसणाºया किंवा सौम्य लक्षणे असणाºया कोविड रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच दहा दिवसांसाठी गृह अलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार आहे; मात्र त्यानंतर पुढील सात दिवस गृहविलगीकरणाचा काळ पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.रुग्णांना द्यावे लागणार प्रतिज्ञापत्रकोविडच्या रुग्णांना होम क्वारंटीनचा पर्याय निवडताना आरोग्य विभागाला प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. त्यानुसार रुग्णाने हा पर्याय स्वेच्छेने निवडला असून, दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणार असल्याची हमीदेखील द्यावी लागणार आहे.जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार, लक्षणं नसलेल्या किंवा सौम्य लक्षणं असणाºया रुग्णांना होम क्वारंटीनमध्ये राहता येणार आहे. अशा रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे.- डॉ. फारुक शेख, वैद्यकीय अधिकारी, मनपा,अकोला.