शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
2
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
3
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
4
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
5
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
6
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
7
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
8
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
9
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
10
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
11
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
12
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
14
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
15
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
16
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
17
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
18
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
19
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
20
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव

आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची धामधूम

By admin | Published: May 21, 2014 10:19 PM

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला.

अकोला : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल गेल्या १६ मे रोजी जाहीर झाले. त्यानंतर अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार या निवडणुकीची अधिसूचना २७ मे रोजी जाहीर होणार असून, ३ मे पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशपत्र दाखल करता येतील. दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी ४ जून रोजी होणार असून, ६ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. २० जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. २४ जून रोजी सकाळी ८ वाजतापासून या निवडणुकीची मतमोजणी सुरू होईल व सायंकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

.*आचारसंहितेचे पालन करा; जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश!अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे आचारसंहितेचे पालन करण्यात यावे, आचारसंहितेचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण शिंदे यांनी बुधवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि तहसीलदारांना दिले.