काेराेनाचे कठाेर निर्बंध कमी झाल्यानंतर हाॅटेल व्यावसायिकांनी पुन्हा एकदा तयारी करत कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली.
ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता हाॅटेलसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीही केली.
वीकेंड हा हाॅटेलसाठी जास्त व्यवसाय देणारा काळ असताे मात्र आता त्या दाेन्ही दिवशी हाॅटेल बंद असल्याने आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
हाॅटेल पुन्हा सुरू झाल्यामुळे नव्याने सर्व तयारी केली हाेती मात्र पुन्हा बंधने सुरू लादल्याने व्यवसायावर परिणाम हाेत आहे.
दादाराव मते, हाॅटेल व्यावसायीक
हाॅटेल अर्धा दिवस जरी सुरू असले तरी लागणारा खर्च हा सारखाच असताे त्यामुळे आताच्या निर्बंधाच्या काळात हा खर्चही भरून निघत नाही.
माणिकलाल सांखला
..........
एकूण हाॅटेल १८७
अवलंबून कर्मचारी ३,७४०
................
हाॅटेल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावरच कर्मचाऱ्यांना मजुरी सहज मिळणे शक्य हाेते. ४ वाजेपर्यंत येणारा ग्राहक हा प्रवासी ग्राहक आहे त्यामुळे संध्याकाळी हाॅटेल सुरू राहणे आवश्यक आहे.
राम कावरे
.................
या व्यवसायाच्या भरवशावर अनेकांचे परिवार आहेत. हा व्यवसाय पूर्णवेळ चालला तर येथे काम करणाऱ्यांना राेजगार मिळेल त्यामुळे वीकेंडला हाॅटेल सुरू राहणे आवश्यक आहे.
प्रभाकर ढाले