लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यात झपाट्याने वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता पोलीस विभागालाही कवेत घेत असून, आतापर्यंत तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी भीतीच्या वातावरण कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे.गुरुवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी दोन जण पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर आली असून, त्यातील एक जण खडकी तर दुसरा रामदासपेठ परिसरातील पोलीस क्वार्टर येथील रहिवासी आहे. या प्रकारामुळे रस्त्यावर रात्रंदिवस ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांना आता कोरोनाची मोठी भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे कंटेनमेंट घेऊन तसेच विविध परिसरात ड्युटी बजावणाºया पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या किट उपलब्ध करून देण्याची मागणी पोलिसांकडून होत आहे.रामदासपेठ पोलीस ठाणे कोरोनाच्या रडारवर रामदासपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या एका कर्मचाºयास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ते राहत असलेला परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
रामदासपेठ पोलीस ठाण्यात याआधीही एएसआय पदाच्या पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर आज पुन्हा पोलीस ठाण्यामधील कॉन्स्टेबल पॉझिटिव्ह आढळल्याने रामदासपेठ पोलीस ठाणे कोरोनाच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे.
सर्वच कर्मचाºयांच्या टेस्टिंग सुरू रामदासपेठ पोलीस ठाण्यातील पॉझिटिव्ह आढळलेल्या कर्मचाºयांच्या संपर्कात आलेल्या इतरही पोलीस कर्मचारी-अधिकाºयांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सोबतच आता इतरही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाºयांची तपासणी करणे अनिवार्य ठरणार आहे.