शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

अकोल्यात कोरोनाबाधितांचा आकडा साडेतीनशे पार; दिवसभरात १४ नवे रुग्ण; दोन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 7:22 PM

१४ पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३५५ वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे शुक्रवारी १५८ जणांचे अहवाल प्राप्त झाले.१४४ अहवाल निगेटिव्ह असून, १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात ४ महिला व १० पुरुष आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, दररोज शहरातील नव-नव्या प्रभागांमध्ये मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवार, २२ मे रोजी दिवसभरात १४ पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३५५ वर पोहचली आहे. दरम्यान, मंगळवारी मृत्यू झालेल्या दोघांचा अहवालही पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडाही २३ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. शुक्रवारी, बार्शीटाकळी, मुर्तीजापूर व पातूर तालुक्याही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनाचा प्रसार संपूर्ण जिल्ह्यात होत असल्याचे दिसून येत आहे.अकोल्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, दररोज मोठ्या संख्यने पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३४१ होती. यामध्ये शुक्रवारी १४ जणांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून शुक्रवारी १५८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १४४ अहवाल निगेटिव्ह असून, १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज दिवसभरात पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात ४ महिला व १० पुरुष आहेत. यात दोघा मयत रुग्णांचाही समावेश आहे. सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये दोघे फिरदौस कॉलनी तर अन्य हिरपूर ता. मुर्तिजापुर, भेंडगाव ता. बार्शिटाकळी, आंबेडकरनगर, गोकुळ कॉलनी येथील रहिवासी आहेत. पैकी भेंडगाव येथील महिला रुग्ण ही मुंबईहून आलेली असून ती वर्धा येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आली होती. आल्यापासून ही महिला गावातील जि.प. शाळेतील अलगीकरण कक्षातच होती. तर सायंकाळी जुने शहर, अकोट फैल, गोकुळ कॉलनी जवाहर नगर, मलकापूर अकोला, मुजावरपुरा-पातूर, हमजा प्लॉट वाशिम बायपास येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २२ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजारामुळे, तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे. आतापर्यंत २०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत १२६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.प्राप्त अहवाल-१५८पॉझिटीव्ह-१४निगेटीव्ह-१४४आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-३५५मयत-२३(२२+१),डिस्चार्ज-२०६दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२६

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला