शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये आदर्श कॉलनी येथील दोघांसह तोष्णीवाल ले-आऊट, खदान, संताजी नगर, खेतान नगर, अकोट, गीता नगर, मोठी उमरी, खदान व कौलखेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
पारस व मांजरी येथील दोघांचा मृत्यू
बाळापूर तालुक्यातील पारस येथील ५६ वर्षीय पुरुष व मांजरी येथील ६६ वर्षीय पुरुष अशा दोघांचा सोमवारी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे २१ नोव्हेंबर व ५ डिसेंबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
रॅपिड चाचण्यांमध्ये तीन ‘पॉझिटिव्ह’
सोमवारी झालेल्या एकूण १९० रॅपिड अॅन्टिजन चाचण्यांमध्ये केवळ तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत २६३१६ चाचण्यांमध्ये १८२८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
१२ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, अशा एकूण १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६५१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९६८० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८७२९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६५१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.