अकोला, दि. १७- जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये पुरवठा केला जाणार्या पोषण आहाराची माहिती शिक्षण समितीच्या पदाधिकार्यांना देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या प्रकाराने पोषण आहाराचे काम नेमके कसे सुरू आहे, याबाबत काहीच थांगपत्ता लागत नाही. माहिती न देणार्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याचे निर्देश शिक्षण समितीच्या सभेत बुधवारी देण्यात आले. त्यामुळे आता पोषण आहारातील वस्तू पुरवठा, तांदळाबाबतची वस्तुस्थिती पदाधिकार्यांपुढे येणार आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पोषण आहार वाटप केला जात नाही. याबाबत शिक्षण समितीच्या सभेत अनेकदा चर्चा झाली. त्याबाबत संबंधितांकडून माहितीही मागवण्यात आली; मात्र ती देण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यात पोषण आहार वाटपाचे नेमके काय चालू आहे, याची माहितीच पदाधिकार्यांना मिळत नाही. माहिती न देणार्या बाळापूर, अकोट, तेल्हारा येथील शालेय पोषण आहार अधीक्षकांना कारणे दाखवा नोटिस देण्याचे ठरले. सोबतच या प्रकाराची चौकशी करून शालेय पोषण आहार पुरवठादार, मुख्याध्यापकांसह जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सभापती पुंडलिकराव अरबट, सदस्य ज्योत्स्ना चोरे, प्रतिभा अवचार, शबाना खातून, संतोष वाकोडे, शिक्षणाधिकारी दिग्रसकर उपस्थित होते. यावेळी शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी देण्यात आलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द केल्याचे पत्र राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांना पाठवण्याचेही ठरले.
पोषण आहाराची माहिती देण्यास टाळाटाळ!
By admin | Published: November 18, 2016 2:01 AM