शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

शाळेच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर टाकला भावना दुखावणारा मजकूर; शिक्षिका निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 5:16 PM

प्राचार्य मॅथ्यू यांनी शनिवारी शिक्षिका सुनील जोसेफ हिला तडकाफडकी निलंबित केले. 

 अकोला : धार्मिक भावना दुखावणारा एक संदेश येथील माउंट कारमेल स्कूलची शिक्षिका सुनीता जोसेफ हिने व्हॉट्स अ‍ॅप गृपच्या माध्यमातून इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना टाकला. हा संदेश उपहास करणारा असून, या संदेशामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची तक्रार पालकांनी प्राचार्य मॅथ्यू करिकल यांच्याकडे केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत, प्राचार्य मॅथ्यू यांनी शनिवारी शिक्षिका सुनीता जोसेफ हिला तडकाफडकी निलंबित केले. शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपवर शैक्षणिक गृप तयार करण्यात आले आहेत. माउंट कारमेल शाळेच्या शिक्षिका सुनीता जोसेफ हिने शुक्रवारी सायंकाळी इयत्ता सहावीच्या व्हॉट्स अ‍ॅपवर धार्मिक भावना दुखावणारे चित्र व तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित केला. पालकांनी हा संदेश वाचल्यावर, त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याची आणि संबंधित शिक्षिकेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तक्रार शाळेचे प्राचार्य मॅथ्यू करिकल यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनीही चित्र व मजकूर तपासला. व्हॉट्स अ‍ॅपवरील हा मजकूर व चित्र आक्षेपार्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी शिक्षिका सुनीता जोसेफ हिला तडकाफडकी निलंबित केले आणि प्राचार्यांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली. 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा