- विजय शिंदेअकोट: राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर टाकत सोशल मीडियामधुन ट्रोलिंग करणाऱ्यांविरुद्ध विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह खासदार व आमदारांनी एक तक्रार परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त स्वामी यांच्याकडे दिली आहे. ट्रोलिंग करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे अकोला उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे (रा.तालुका अकोट जि.अकोला)यांचाही समावेश असल्याची खातरजमा करीत मुबंई वरून पोलीसांनी चौकशी सुरू केली आहे.या संदर्भात प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की , कोरोना सारखे संकट राज्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस हे सरकारला चांगली सहकायार्ची भुमिका घेत भाजपाचे सर्व कार्यकर्ते काम करीत आहोत. परंतु काही जण फडणवीस यांच्यावर अश्लिल व हीन प्रकारची पोस्ट,काँमेन्ट सोशल मिडीयावर केल्या आहेत. पोलीसांची लक्ष देण्याची जबाबदारी असल्याचे त्यानी म्हटलं आहे एकीकडे आमची साधी पोस्ट असली राज्यात गुन्हे दाखल केले जातात; मात्र राज्याचे मुख्यमंत्री राहीलेले सुसंस्कृत व्यक्ती असलेले फडणवीस यांची प्रतिमा मलीन करणारे राजकीय षडयंत्र करीत आहेत,असा आरोप निवेदनात केला आहेया तक्रारीत फडणवीस यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट ट्रोलिंग करणाºयो लोकांची नावे,फेसबुक अकाउंट आहेत,त्यांनी केलेले काँमेन्ट व नंबर पोलीसांना दिले आहेत. यामध्ये शिवसेनेचे अकोला उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांचाही समावेश आहे. तक्रारीत नामोल्लेख असलेल्यांना त्वरीत ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करीत अटक करण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांनी चौकशी सुुरु केल्याची माहिती आहे.आपण बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले काम करत आहेत. सुरुवात पासूनच देवेंद्र फडणवीस त्रास देत आहेत. कोरोना सारख्या संकटकाळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे, याकरीता फडणवीस षडयंत्र रचत आहेत. त्यांच्या या कृतीचा निषेध म्हणून आपण सोशल मीडियावर ट्रॉलिंग करुन पोस्ट केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजकारणात विनाकारण कोणी जर त्रास देत असेल तर हजारो गुन्हे दाखल झाले तरी चालतील.-दिलीप बोचे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, अकोला
देवेंद्र फडणवीस याच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट; शिवसेना अकोला उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांची पोलिसांकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 2:52 PM
ट्रोलिंग करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे अकोला उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे (रा.तालुका अकोट जि.अकोला)यांचाही समावेश
ठळक मुद्देविधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह खासदार व आमदारांनी एक तक्रार दिली आहे. तक्रारीत फडणवीस यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट ट्रोलिंग करणाºयो लोकांची नावे,फेसबुक अकाउंट आहे.