लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर विशिष्ट जाती-धर्माबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त करणार्या कौलखेड परिसरातील एका युवकाविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री तक्रार देण्यात आली आहे. सदर युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.कौलखेड येथील रहिवासी वैभव ढोरे या युवकाने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर दादू पावसाळे यांच्या फेसबुक पानावर प्रतिक्रि या देताना विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. या प्रतिक्रियेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून, यामुळे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे अशा व्यक्तीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी म्हणूण खदान पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीद्वारे प्रतिक्रिया देणारा वैभव ढोरे व त्यावर आणखी प्रतिक्रिया देणार्या व ते लाइक करणार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. खदान पोलिसांनी या प्रकरणी तातडीने दखल घेऊन रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
फेसबुकवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया; तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 1:57 AM
अकोला : फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर विशिष्ट जाती-धर्माबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त करणार्या कौलखेड परिसरातील एका युवकाविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री तक्रार देण्यात आली आहे. सदर युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
ठळक मुद्देखदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री तक्रार युवकाविरुद्ध गुन्हा दाखल