अकोला: अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत अधिकाऱ्यांनी कार्यालयात हजर राहून नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित असताना, जिल्हा वाऱ्यावर सोडून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी अमरावती येथे बैठकीला गेल्याने, संताप व्यक्त करीत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महापौर अर्चना मसने यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) कक्षात ठिय्या दिला. यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी आमदारांनी यावेळी केली. यावेळी आ. गोवर्धन शर्मा, महापौर अर्चना मसने यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या कक्षात ठिय्या दिला. यासंदर्भात आ. सावरकर यांनी विभागीय आयुक्त तसेच राज्याच्या मुख्य सचिवांसोबत भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. तसेच यासंबंधी शासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी भाजपचे तेजराव थोरात, माधव मानकर, संजय बडोणे, श्रीकृष्ण मोरखडे, गिरीश जोशी, जयंत मसने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिकारी अमरावतीला, आमदारांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:13 AM