बुलडाणा : केंद्र शासनाने बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्व केंद्र पुरस्कृत योजनांची पुनर्रचना केली आहे. त्यानुसार केंद्र पुरस्कृत एकात्मिक गळीतधान्य, कडधान्य व मका विकास कार्यक्रमाऐवजी राष्ट्रीय तेलबिया व तेलताड अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाने ११ कोटी ४६ लाख ४८ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय गळीत धान्य उत्पादन कार्यक्रम, राष्ट्रीय कडधान्य विकास कार्यक्रम व गतीमान मका विकास कार्यक्रम राज्यात २0१३-१४ पर्यंंत राबविण्यात येत होता. केंद्र शासनाने बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्व केंद्र पुरस्कृत योजनांची पुनर्रचना केली आहे. त्यानुसार केंद्र पुरस्कृत एकात्मिक गळीतधान्य, कडधान्य, तेलताड व मका विकास कार्यक्रमाऐवजी राष्ट्रीय तेलबिया व तेलताड अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत उपअभियान-१ (तेलबिया), उपअभियान-२ (तेलताड) व उपअभियान-३ (वृक्षआधारीत तेलबिया) अशा तीन टप्प्यांचा समावेश राहणार आहे. या अभियानाच्या निधीत केंद्र व राज्य हिश्याचे प्रमाण ७५:२५ असे राहणार असून, त्यासाठी केंद्र शासनाने दिलेला दुसर्या हफ्ता आणि राज्य शासनाचा वाटा मिळून, एकूण ११ कोटी ४६ लाख ४८ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रीय तेलबिया व तेलताड हे अभियान राज्यात २0१४-१५ मध्ये राबविण्यात येणार आहे. या निधीपैकी ११५.९२ लाख रूपये अनुसुचित जाती, १0१.१५ लाख रूपये अनुसुचित जमाती व ९१९.४१ लाख रूपये सर्वसाधारण घटकासाठी खर्च करण्यात येणार आहेत. या अभियानामुळे राज्यात येत्या हंगामात तेलबिया पिकांचे तसेच तेलताडच्या लागवडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
कडधान्य विकासाऐवजी राबविले जाणार तेलबिया अभियान
By admin | Published: January 30, 2015 1:01 AM