मोर्णा नदीतील जलकुंभी जैसे थे
अकोला : काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात मोर्णा नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते, मात्र त्यानंतर प्रशासनासोबतच अकोलेकरांना या मोहिमेचा विसर पडला. नदीपात्रात आता केवळ कचरा, सांडपाणी आणि जलकुंभी शिल्लक आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
अकोला : जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसानंतर अनेक ठिकाणी डबके साचले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून, शहरातील विविध भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. आरोग्य विभागामार्फत डबक्यांमध्ये फवारणी करण्याची आवश्यकता आहे.
नॉनकोविड रुग्णसेवा होणार पूर्ववत
अकोला : जिल्ह्यातील कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. शिवाय, रुग्णालयांमध्येही रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील नॉनकोविड रुग्णसेवा लवकरच पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याअनुषंगाने जीएमसी प्रशासनातर्फे तयारी केली जात आहे.
निर्बंध शिथिल, मात्र बेफिकिरी कायम
अकोला : जिल्ह्यातील कोविडच्या परिस्थितीत सुधारणा हाेत आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर कोविडच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध शिथिल केले जात आहेत, मात्र अनेक जण बेफिकिरीने वावरताना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लहान मुलांच्या चाचण्यांचे प्रमाण वाढले
अकोला : खासगी रुग्णालयात दाखल बाल रुग्णांची संख्या गत काही दिवसांमध्ये वाढली आहे. बाल रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे दिसू लागल्याने त्यांची कोविड चाचणी केली जात आहे. यामध्ये निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र लहान मुलांमध्ये वाढत्या आजारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.