अकोला, दि. २२- जुने शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार देवीदास वडमारे यांनी दोन गटांतील वाद सोडविताना पोलिसांवर हल्ला करणार्यांवर गोळीबार केला होता. या प्रकरणाची चौकशी मानवाधिकार आयोगाकडून सुरू करण्यात आली आहे. या आयोगाची तीन सदस्यीय समिती शनिवारी अकोल्यात दाखल झाली.मनपाच्या शाळेमध्ये अलीयार खान यांच्या मुलाचे १ जून २0१२ रोजी सायंकाळी लग्न होते. या लग्न सोहळय़ात डीजे वाजविण्यावरून वाद झाले.वादाचे परिणाम हाणामारीत झाल्यानंतर या प्रकरणाची माहिती जुने शहरचे त त्कालीन ठाणेदार डी. डी. वडमारे यांना मिळताच त्यांनी ताफ्यासह घटनास्थळावर दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र २0 ते २५ हल्लेखोरांचा एक गट पोलिसांच्या अंगावर आल्याने ठाणेदार वडमारे यांनी हवेत गोळीबार केला होता. यावेळी एक गोळी अलीयार खान यांच्या मुलाला लागल्याने तो गंभीर ज खमी झाला होता. याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. अलीयार खान यांचा मुलगा वाजीद खान गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर वाजीद खानने या प्रकरणाची तक्रार पोलीस अधीक्षकांसह पोलीस महासंचालकांपर्यंत केली; मात्र दखल न घेतल्याने त्यांनी एक तक्रार मानवाधिकार आयोगाकडे केली असून, त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
जुने शहरातील गोळीबार प्रकरणाची चौकशी!
By admin | Published: October 23, 2016 2:13 AM