अकोला: जून महिन्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण शहरात हाहाकार उडाला होता. वादळी वाºयामुळे सर्वाधिक नुकसान जुने शहरातील प्रभाग क्र. १०, प्रभाग ८ व प्रभाग १८ मध्ये झाले होते. त्यावेळी लहान-मोठे वृक्ष उन्मळून पडून विद्युत खांब वाकल्यामुळे रस्त्यांवर विजेच्या तारांचा खच पडल्याचे चित्र होते. महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत केल्यानंतर वाकलेले विद्युत खांब काढून घेणे अपेक्षित होते. दीड महिन्यांचा कालावधी होत असला, तरी अद्यापही प्रभाग क्रमांक १० मध्ये वाकलेले विद्युत खांब, बंद पथदिव्यांची समस्या कायम असल्याने महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात आलेला मुसळधार पाऊस व वादळी वाºयाने शहरावर नैसर्गिक संकट ओढवले होते. शहरातील मुख्य रस्ते असो वा प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे वृक्ष उन्मळून जमीनदोस्त झाले होते. वाºयाच्या वेगामुळे विद्युत खांब वाकण्यासोबतच रस्त्यांवर विजेच्या तारा तुटल्या होत्या. त्यावेळी शहरावर नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी मनपाची प्रशासकीय यंत्रणा, सर्वपक्षीय नगरसेवक तसेच महावितरण कंपनीचे कर्मचारी सरसावल्याचे चित्र होते. वृक्ष कोसळण्याचे सर्वाधिक प्रमाण जुने शहरात आढळून आले. त्यामध्ये विद्युत खांब मोठ्या प्रमाणात वाकून विजेच्या तारा तुटल्या होत्या. पथदिवे बंद झाले होते. महावितरण कंपनीने दुसºया दिवशी वाकलेल्या खांबांवरून तात्पुरता विद्युत पुरवठा सुरळीत केला, त्यानंतर महिनाभरानंतर वाकलेल्या विद्युत खांबाजवळ नवीन खांब उभारले. अर्थातच, नागरिकांच्या घरावर, मुख्य रस्त्यावर वाकलेले खांब हटविणे अपेक्षित असताना महावितरणला अद्यापही मुहूर्त सापडला नसल्याचे दिसत आहे. यामुळे प्रभाग क्रमांक १०, ८ व १८ मध्ये दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची परिस्थिती आहे.जुने शहरातील प्रभाग १०, ८ व १८ मधील पथदिवे बंद आहेत. प्रभाग १० मध्ये वाकलेले खांब अद्यापही कायम असून, नवीन खांबावरून दिलेली वीज जोडणी सदोष असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. वाकलेले विद्युत खांब तातडीने हटवून पथदिव्यांची समस्या निकाली काढण्याची सूचना महावितरणच्या अभियंत्यांसह मनपा प्रशासनाच्या अभियंत्यांना केली आहे. सदर कामावर जातीने लक्ष असून, ते निकाली काढल्या जाईल.-वैशाली शेळके, उपमहापौर.