शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

दहा वर्षीय नातवाच्या शोधासाठी वयोवृद्ध आजीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:47 PM

अकोला: हरविलेला दहा वर्षीय नातू मोहम्मद अवेसच्या शोधासाठी वयोवृद्ध, अशिक्षित आजी मुमताज मागील ९ दिवसापासून अकोल्यातील पोलीस ठाणे आणि वृत्तपत्र कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे.

अकोला: हरविलेला दहा वर्षीय नातू मोहम्मद अवेसच्या शोधासाठी वयोवृद्ध, अशिक्षित आजी मुमताज मागील ९ दिवसापासून अकोल्यातील पोलीस ठाणे आणि वृत्तपत्र कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. पोलीस यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात असल्याने या व्याकूळ वृद्ध महिलेचे शल्य समजून घेण्यास कुणाला वेळ नाही.मात्र अशिक्षित असलेल्या मुमताज यांना नातू हवा आहे.मुजफ्फर नगरात राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्धा मुमताज यांच्या विवाहित मुलीचा आणि जावयाचा सात वर्षांपूर्वी मृत्यू झाला. मातृ-पितृछत्र अकाली निघून गेल्याने मोहम्मद अवेस निराधार झाला. तो तीन वर्षांचा असताना मुमताज यांनी त्याचे पालनपोषण केले. दहा वर्षीय मोहम्मद अवेस ७ एप्रिल १९ रोजी येथून जवळच असलेल्या हक्कानिका मशीदजवळच्या पटांगणात खेळायला गेला. सायंकाळपर्यंतही तो घरी न परतल्याने त्याचा शोधाशोध सुरू झाला. अचानक आणि तेवढ्याच नाट्यमय पद्धतीने बेपत्ता झालेल्या नातवाला शोधण्यासाठी मुमताजने रामदासपेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांंनी बेपत्ता झाल्याची नोंद घेतली; मात्र अशिक्षित असलेल्या मुमताजला मात्र नातू हवा आहे. दररोज ती पोलीस ठाण्यात येऊन विचारपूस करीत असल्याने पोलिसांनी आता मुमताजला वृत्तपत्राचे कार्यालय दाखविले आहे. दहा वर्षीय नातवाच्या शोधासाठी आजीची सुरू असलेली पायपीट अनेकांचे काळीज पिळवटून टाकणारी ठरत आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाMissingबेपत्ता होणं