अकोला : विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघअकोला महानगराच्यावतीने 5 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास शहरातील शिवाजीनगर, विजयनगर, न्यू तार फाईल, देशमुख पेठ आदी भागातून स्वयंसेवकांचे पथक संचालन निघाले होते. ठिकठिकाणी संघ स्वयंसेवकांवर पुष्पवर्षाव करून महिला भगिनी व नागरिकांनी स्वागत केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दरवर्षी विजयादशमीला पथसंचलन काढण्यात येते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्ष पतसंचलन काढण्यात आले नव्हते. त्यामुळे यंदाच्या पथसंंचालनामध्ये स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विभाग संघचालक प्राध्यापक नरेंद्र देशपांडे व महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात संघ स्वयंसेवकांचे पथसंचालनाला अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाजीनगर येथून सुरुवात झाली. त्यानंतर संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन शिवाजीनगर सह न्यू कार फाईल, विजय नगर, देशमुख पेठ, शिवाजी कॉलेज समोरून मार्गक्रमण करीत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहोचले. या ठिकाणी संघ गीत व भगव्या ध्वजाला प्रणाम करून पथसंचलनाचा समारोप करण्यात आला.