मुलीच्या वडिलांनी मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिल्यानंतर मलकापूरसह बुलडाणा पाेलीस चकीत झाले हाेते. त्या प्रेमीयुगुलांचा तपास करण्यासाठी तीन पोलीस पथक नेमून एक व्याळा, एक पारस, एक पुणे येथे रवाना केले होते. या तीन ठिकाणी प्रेमीयुगुल असल्याची माहिती बुलडाणा एलसीबीला मिळाली. एका पथकाने अकोला एलसीबीप्रमुख विलास पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यानुसार एलसीबीचे प्रमोद डोयफोळे, टाले, अश्विन व बुलडाणा पोलिसांनी २३ डिसेंबर रोजी रात्री २ वाजता एका घरातून तिन्ही प्रेमीयुगुलास व त्यांना मदत करणाऱ्या हिरोडे नामक युवकास अटक केली. सर्वांना पुढील कारवाईसाठी बुलडाणा येथे रवाना केले. या घटनेमुळे गावात उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्या तिन्ही बहिणी व्याळा येथे कशा आल्या, हे प्रेमप्रकरण आहे की, दुसरा काही प्रकार आहे, हे तपास झाल्यावरच स्पष्ट होईल.
तीन प्रेमीयुगुलांसह एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:16 AM